साऊथचे फेवरेट कपल समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यला वेगळे होऊन एक वर्ष पेक्षा जास्त काळ झाला आहे. यांची जोडी इंडस्ट्रीमधील फेमस जोडींपैकी एक होती. भलेही आज दोघे वेगळे झाले आहेत पण त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये आज देखील प्रश्न येतो कि ते वेगळे का झाले. तथापि घटस्फोटादरम्यान अनेक प्रकारचे अंदाज लावले गेले. यामध्ये चैतन्यच्या चाहत्यांनी समांथावर अनेक आरोप लावले, कारण तिच्या लिंकअपच्या चर्चा खूप होत होत्या. अशामध्ये आता लेटेस्ट माहिती समोर आली आहे ज्याचे कारण काही वेगळे असल्याचे समोर आले आहे.
समांथा आणि नागा चैतन्यचे लग्न फक्त चार वर्षेच टिकले. यानंतर दोघांनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी सोशल मिडियावर एका पोस्टद्वारे वेगळ होत असल्याची घोषणा करून चाहत्यांना शॉक्ड केले होते. ज्यानंतर अनेक अंदाज लावले गेले होते. नंतर देखील यांच्या घटस्फोटाचे स्पष्ट कारण समोर आले नाही.
आता समांथा आणि नागा चैतन्य वेगळे झाल्यानंतर तीद वर्षानंतर त्यांचे गुपित समोर आले आहे. फिल्म क्रिटिक्स उमैर संधूने यांच्या घटस्फोटाचा खुलासा केला आहे. त्यांच्या ट्वीट नुसार समांथाने नागा चैतन्यवर अनेक गंभीर आरोप लागले आहेत.
समंथा रुथ प्रभूने अप्रत्यक्षपणे नागा चैतन्यपासून घटस्फोटाचा खुलासा केला आहे. चित्रपट समीक्षक उमैर संधूने ट्विट मध्ये लिहिले आहे कि, समांथाच्या म्हणण्यानुसार, नागा चैतन्यने तिच्यासोबत गैरवर्तन केले. तो खूप वाईट नवरा आहे. उमैरने त्याच्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, ‘मला मानसिक छळ सहन करावा लागला आहे. मारहाण केली (शारीरिक छळ). मी गरोदर होते पण माझा गर्भपात झाला. देवाचे आभार, मी घटस्फोट घेतला आणि त्याच्यापासून वेगळे झाले’. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर समांथा आणि नागा चैतन्य यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
चित्रपट समीक्षकांचे हे ट्विट समोर आल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचे कारण पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीत चर्चेत आले आहे. काही लोकांचा विश्वास बसत नाही की हे खरे आहे का? मात्र, समांथा आणि नागा चैतन्य सध्या त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. समांथा तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी जोरदार तयारी करत असताना, चैतन्यने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. समांथा च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘खुशी’, ‘शकुंतलम’ सोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.
समांथा रुथ प्रभूचा खळबळजनक खुलासा, म्हणाली; ‘प्रेग्नंसी नंतर अबॉर्शन, मारहाण देखील सहन केली, नागा चैतन्य वाईट नवरा होता…
RELATED ARTICLES