टॅलेंटेड असूनही काही सिनियर कलाकार ऑडिशनमध्ये फेल होतात, अशावेळी कसे वाटते याची जाणीव केली जाऊ शकते. असेच काही दिग्गज अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत होत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. रेणुकाने सांगितले कि ती सध्या ऑडिशनमध्ये नेहमी रिजेक्ट होते. अभिनेत्री म्हणाली कि तिला रिजेक्ट होण्याची प्रोसेस समजत नाही आहे.
रेणुकाने सांगितले कि रिजेक्शनला कधी गंभीरतेने घेत नाही. एका मुलाखतीमध्ये रिजेक्शनवर बोलताना ती म्हणाली कि, ऑडिशननंतर रिजेक्ट होणे अनेकवेळा झाले आहे. मी डायरेक्टरकडून आपले कॅरेक्टर समजून घेऊ इच्छिते. पण सध्या कास्टिंग डायरेक्टर्सचे असिस्टेंट हे काम करतात. मी हि प्रोसेस समजू शकत नाही, यामुळे मी या ऑडिशन्स क्रॅक करू शकत नाही आहे.
मला वाटते कि ऑडिशंसमध्ये मी माझे १००% देऊ शकत नाही आहे. पण मी या रिजेक्शंसला गांभीर्याने घेत नाही. तसेच मी हा देखील विचार करत नाही कि मी एक वाईट अभिनेत्री आहे. मी देखील एक दिग्दर्शक आहे आणि वेगवेगळ्या अभिनेत्यांचा शोध घेत असते. मला माहित आहे कि हे अभिनयाबद्दल नाही, फक्त इतके हे कि अभिनेता आपल्या कॅरेक्टरपर्यंत पोहोचू शकत नाही.
रेणुका शहाणेबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे आणि शोचा भाग राहिली आहे. रेणुकाचा नुकताच गोविंदा नाम मेरा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये ती विक्की कौशल, कियारा आडवाणी आणि भूमि पेडनेकरसोबत मुख्य भूमिकेमध्ये आहे. शशांक खेतानच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटामध्ये रेणुकाने महत्वाची भूमिका केली आहे. तिच्या कॉमिक भूमिकेचे कौतुक होत आहे. रेणुका अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे.
रेणुकाचे अभिनय करियर १९८८ मध्ये सुरु झाले होते. ती तमाचा चित्रपटामध्ये देखील दिसली होती. यानंतर रेणुका दिग्दर्शक सूरज बड़जात्याच्या हम आपके हैं कौन चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामुळे रेणुकाला एक ओळख मिळाली होती. चित्रपटामध्ये ती सलमान खानच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. रेणुका दिग्दर्शनातही उतरली आहे. तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या त्रिभंगा चित्रपटाला खूपच पसंद केले होते. हा चित्रपट २०२१ मध्ये आला होता.