बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज २७ डिसेंबर रोजी ५७ वर्षाचा झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा बांद्रामध्ये त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला गेला. या सेलिब्रेशनला सलमान खान सहित शाहरुख खान आणि त्याचे जवळचे मित्र उपस्थित होते. पार्टीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये सलमान खान शाहरुख खानला मिठी मारताना आणि संगीता बिजलानीला कीस करतानाचा व्हिडीओ चर्चेमध्ये आहे. सलमान आणि शाहरुख अनेक वर्षांनंतर एकत्र आले आहेत. तर संगीता बिजलानी सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आहे. दोघांचे लग्न होणार होते पण नंतर हे नाते तुटले.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. यावेळी सेलिब्रेशन त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर नसून बांद्रामध्ये झाले. पार्टीमध्ये सलमानचा केक देखील खूप चर्चेमध्ये आहे. त्याची बहिणी अर्पिता, अलविरा, भाऊ सोहेल खान, अरबाज खान, सोनाक्षी सिन्हा, तब्बू, रितेश-जेनेलिया, युलिया, संगीता बिजलानी सहित अनेक सेलेब्स पोहोचले होते.
शाहरुख खानची एन्ट्री पार्टीमध्ये खूपच वेळाने झाली. तथापि जेव्हा सलमान आणि शाहरुख भेटले तेव्हा प्रत्येकाची नजर त्यांच्यावर होती. सलमानने शाहरुखला मिती मारली तेव्हा सर्वांना करण-अर्जुनची आठवण झाली. तर पार्टीमध्ये संगीता बिजलानी देखील चर्चेत राहिली.
जेव्हा संगीता बिजलानी जात होती तेव्हा सलमान खान देखील तिला सोडायला आला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या. जाताना संगीता आणि सलमानने एकमेकांना मिठी मारली आणि खूप वेळ मिठीत राहिले. नंतर सलमान खानच्या तिच्या कपाळावर कीस केले.
त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी त्यांच्या या व्हिडीओला क्युट म्हंटले आहे. तर एकाने कमेंट केली आहे ओह माई गॉड, दोन एक्स लवर्स, दुखद, हैराणी होते कि त्यांच्या मनामध्ये काय चालू असेल. दोघांचे जवळ जवळ लग्न झालेच होते.
View this post on Instagram