बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या आगामी किसी का भाई किसी कि जान चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. तो प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहतो. कधी लव्ह लाईफ तर काही लग्न अभिनेता नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
सध्या बॉलीवूडची त्याच्याबद्दल आणखी एक चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. सलमानला त्याची नवीन पार्टनर मिळाली आहे आणि तो तिच्यासोबत सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. सलमान खान आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनमध्ये राहिला आहे आणि त्याचे नाते वाईटरित्या संपले आहे.
पण माहितीनुसार आता सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. असे म्हंटले जात आहे कि सलमान खान साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री पूजा हेगडेला डेट करत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री पूजा हेगडे सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटामध्ये देखील काम करत आहे.
वास्तविक उमैर संधूने केलेल्या एका ट्वीटने बॉलीवूडमध्ये सध्या खळबळ उडवून दिली आहे. उमैरचे म्हणणे आहे कि सलमान खान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये आहेत. उमैरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे कि, ब्रेकिंग न्यूज…बॉलीवूडमध्ये सध्या एक नवीन कपल समोर आले आहे.
मेगा स्टार सलमान खानला पूजा हेगडेवर प्रेम झाले आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसने पूजाला आपल्या दोन चित्रपटांसाठी साईन देखील केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत आहेत आणि सलमान खानच्या जवळच्या मित्राने याला कंफर्म केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमानजवळ सध्या किसी का भाई किसी की जान, किक २, सूरज बड़जात्यासोबत एक चित्रपट आणि नो एंट्रीचा सिक्वेल असे चित्रपट आहेत. यासोबत तो शाहरुख खानसोबत पठाणमध्ये देखील कॅमियोमध्ये दिसणार आहे. याशिवाय पूजा हेगडे सलमान खानसोबत किसी का भाई किसी की जान आणि रणवीर सिंहसोबत सर्कस चित्रपटामध्ये दिसणार आहे.
BREAKING NEWS : New Couple in Town !!! Mega Star #SalmanKhan fell in love with #PoojaHegde !! His production house also signed her for next 2 films !! They are spending time together now a days !! Confirmed by Salman Khan close sources. pic.twitter.com/2lkNIXH3IE
— Umair Sandhu (@UmairSandu) December 7, 2022