९ मार्चचा दिवस सिने जगतासाठी काळा दिवस ठरला. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता सतीश कौशिक यांनी या जगाचा निरोप घेतला. ६६ व्या वर्षी अचानक सतीश कौशिक यांनी अचानक घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी ठरली. सतीश कौशिक यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अनुपम खेर, अभिषेक बच्चन, शहनाज गिल, शिल्पा शेट्टी सहित अनेक कलाकार त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले होते. एकीकडे जिथे मित्राच्या निधनावर अनुपम खेर यान अश्रू आवरले नाहीत तर सलमान खान आपले अश्रू लपवताना दिसला.
सलमान खान आणि सतीश कौशिक त्यांच्या चांगली बाँडिंग होती. यामुळे त्यांना अंतिम निरोप देताना सलमान खान खूपच भावूक झाला. एकीकडे सतीश कौशिक यांना अंतिम निरोप आणि दुसरीकडे सलमान खानचे अश्रू हे पाहून प्रत्येकजण इमोशनल झाला. सतीश कौशिकने २००३ मध्ये रिलीज झालेल्या तेरे नाम चित्रपटासाठी सलमान खानला मुख्य अभिनेता म्हणून कास्ट केले होते. तेरे नाम चित्रपट बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे.
सतीश कौशिक यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि ११ वर्षाची मुलगी वंशिका असा परिवार आहे. वंशिकाच्या आधी सतीश कौशिक यांना एक मुलगा होता, पण मुलगा वयाच्या २ व्या वर्षी मरण पावला. मुलाच्या मृत्यूने सतीश कौशिक खूपच खचले होते, ज्याची कमी त्यांना नेहमी जाणवायची. परंतु त्यांनी नेहमी आपल्या हास्याने आपल्या मनामध्ये असलेली वेदना लपवली.
Salman Khan arrives at #SatishKaushik funeral….!!!@BeingSalmanKhan
— Salman Khan FC (@SalmansDynamite) March 9, 2023