बॉलीवूड अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सलमान खान च्या सोबत तिचे जुने फोटो शेअर करत पुन्हा एकदा अभिनेत्यावर आरोप केले आहेत. सोमी ने सलमान खान वर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि नंतर काही वेळा ने तिची पोस्ट डिलीट केली आहे. एवढेच नाही तर सोमी अली ने सलमान खान ला पाठींबा देणाऱ्या अभिनेत्रींवर देखील निशाना साधला आहे.
प्रत्यक्षात, सोमी अली ने सलमान खान सोबत चा तिचा एक जुना फोटो शेअर केला, ज्यामध्ये अभिनेता तिला गुलाबाचे फुल देताना दिसत आहे. त्यासोबत सोमी ने लिहिले आहे, अजून खूप काही घडणार आहे.
माझ्या मालिकेला भारतात बंद करण्यात आले आणि नंतर वकिलांनी मला धमकी देखील दिली. तू भित्रा माणूस आहे. मला वाचवण्यासाठी ५० वकील उभे राहतील, जे मला सिगरेट ने भाजवने आणि फिजिकल अब्युज पासून वाचवतील जे माझ्या सोबत वर्षानुवर्षे तू करत आलेला आहे.
त्याच्या पुढे सोमी अली ने अभिनेत्रींच्या वर आपला निशाना साधला आणि म्हणाली, त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे जो महिलांना मारहाण करणाऱ्या माणसाला पाठींबा देत आहेत. अश्या अभिनेत्यांना देखील लाज वाटली पाहिजे, ज्यांनी त्याला पाठींबा दर्शवला. आता ही टोकाची लढाई आहे’. सोमी अली ची ही पोस्ट सोशल मिडीयावर खूपच वेगाने वायरल होताना दिसत आहे. काही वेळाने अभिनेत्रीने ही पोस्ट डिलीट केली आहे.
हे पहिल्यांदाच घडलेले नाही जेव्हा सोमी अली ने सलमान खान वर निशाना साधला आहे. अभिनेत्रीने मैने प्यार किया चे पोस्टर शेअर करताना लिहिले होते की त्यांची पूजा करणे बंद करा. त्यासोबतच नाव न घेता तिने सलमान वर मारहाण केल्याचा आरोप देखील केला आहे. ९० च्या दशकात सोमी अली आणि सलमान खान रिलेशन मध्ये होते. दोघे सोबत अनेक कार्यक्रमात एकत्र देखील दिसले होते. परंतु दोघांचे संबंध जास्त दिवस टिकू शकले नाहीत आणि ती अमेरिकेला स्थायिक झाली.