HomeBollywoodबॉलीवूड हादरले ! सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन...

बॉलीवूड हादरले ! सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन…

सलमान खान सारखा दिसणारा आणि त्याच्या सारखी शरीरयष्टी असणारा सागर सलमान पांडे चे निधन झाले आहे. रिपोर्ट नुसार सागरचा मृत्यू जिम मध्ये व्यायाम करताना झाला. सागर ४५-५० वयाचा होता. तो साल १९९९ पासून सलमान खान च्या चित्रपटांमध्ये त्याचे बॉडी डबल बनत आलेला आहे. सागर ने आपल्या करिअर ची सुरुवात कुछ कुछ होता है पासून केली होती, त्यानंतर त्याने ५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सलमान खान सारखा दिसणारा आणि त्याच्या सारखी शरीरयष्टी असणारा सागर सलमान पांडे चे निधन झाले आहे. भास्कर रिपोर्ट नुसार सागर चा मृत्यू जिम मध्ये व्यायाम करताना झाला. सागर ४५-५० वयाचा होता. तो साल १९९९ पासून सलमान खान च्या चित्रपटांमध्ये त्याचे बॉडी डबल बनत आलेला आहे.सागर ने आपल्या करिअर ची सुरुवात कुछ कुछ होता है पासून केली होती, त्यानंतर त्याने ५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हि गोष्ट सलमान खानचा दुसरा बॉडी डबल असलेला शंतनू घोषने मुलाखती दरम्यान बोलताना हे सांगितले, तो म्हणाला सागर जिम मध्ये व्यायाम करत होता आणि अचानक खाली पडला. शांतनूने पुढे सांगितले की, सलमान खान खानचे चाहते हे आमचे देखील चाहते बनतात, अशातच आम्हाला देखील त्याच्या सारखीच तब्बेत ठेवावी लागते. जर आम्ही सामान्य लोक असतो तर आम्हाला फिट रहाणे एक पर्याय असता. परंतु आम्ही सलमान चे बॉडी डबल आहोत, तर आमची जबाबदारी आहे की आम्ही त्याच्या सारखे फिट राहायला पाहिजे.

सागरला लगेचच मुंबई च्या जोगेश्वरी ईस्ट मधील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर म्युनिसिपालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की हॉस्पिटल पोहोचण्या अगोदर सागर चा मृत्यू झाला आहे. एका जुन्या मुलाखतीत सागर ने सांगितले होते की त्याला लॉकडाऊन दरम्यान काम बंद असल्यामुळे आर्थिक अडचणी चा सामना करावा लागला होता. सागर च्या कमाईचे मुख्य स्तोत्र अभिनय आणि रंगमंचावरील कार्यक्रम होते, परंतु लॉकडाऊन मध्ये साऱ्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद होते आणि कार्यक्रम देखील रद्द झाले होते.

मुलाखतीत सागर ने सांगितले होते की तो देखील सलमान सारखा बैचलर आहे. सागर चे ५ भाऊ आहेत आणि सागरच त्यांचा सर्व खर्च पाहात असतो. सागर प्रतापगढ उत्तरप्रदेश मधील आहे तो खूप आधी हिरो बनण्यासाठी मुंबई ला आलेला होता, जेव्हा त्याला चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही तेंव्हा त्याने बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

बॉडी डबल बनण्याचे सागर चे करिअर १९९८ चा चित्रपट कुछ कुछ होता है पासून सुरु झाले होते. त्यानंतर सागर बजरंगी भाईजान, ट्यूबलाईट, दबंग, दबंग २ सारख्या चित्रपटांमध्ये सलमान चा बॉडी डबल बनला आहे. सागरने आता पर्यंत ५० चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts