अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान ला हरवून एक विक्रम केला आहे. त्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या सोशल मिडिया अकौंट वर अभिनंदनाचा ओघ सुरु झाला. दरम्यान बाडमेर येथील शेरपुरा कानासार येथील १४ वर्षीय मुमल मेहर गावात क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडीओ कोणीतरी काढला. तिच्या या प्रतिभेला योग्य व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला. मुमलचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये मुलगी क्रिकेटर सूर्यकुमार यादव प्रमाणे चौकार आणि षटकार मारत आहे.
या व्हिडीओ मध्ये मुमल एका नंतर एक शॉट मारत आहे. तिची सर्वोत्कृष्ट फटकेबाजी पाहून सर्वानाच आश्चर्य वाटते. मुमल मेहर शेरपूर कानासर चे शेतकरी मठार खान यांची मुलगी आहे. तिच्या घरातील परिस्थिती खूप हालाकीची आहे. खेळण्यासाठी तिच्या जवळ बूट देखील नाहीत. तिने कधी तिच्या पायात बूट नसल्याची चिंता केली नाही. तिला जेव्हा देखील बैट मिळेल तिथे ती चांगले शॉट खेळण्यास सुरुवात करते. मग समोर गावातील कितीही मोठा गोलंदाज असो.
मुमल मेहर चे वडीलांची कमाई एवढी नाही कि ते त्यांच्या मुलीला क्रिकेटचे चांगले ट्रेनिंग देऊ शकतील. मुमल ला अजून सहा बहिणी आहेत. सध्या शाळेतील शिक्षिक रोशन खान मुमल तिचा सराव घेत आहेत. तो तिला क्रिकेटमधील लहान गोष्टी सांगतात. दररोज तीन ते चार तास सराव करून घेतात. मुमल ला खेळासोबतच आई ला कामामध्ये हातभार लावावा लागतो. घरातील शेळ्यांना देखील चरायला न्यावे लागते. मुमल ला सहा बहिणी आणि दोन भाऊ आहेत. मुमल घरापासून तीन किलोमीटर लांब शाळेला चालत जाते. क्रिकेटचा सराव करते आणि परत घरी येते.
मुमल चे म्हणणे आहे कि ती इंडियन क्रिकेट स्टार सुर्यकुमार ची बैटिंग पाहते. त्याला पाहून लांबच लांब शॉट मारण्याचा प्रयत्न करते. दररोज तीन चार तास खेळते. रोशन भाऊ तिच्या कडून सराव करून घेतात. अलीकडे ग्रामीण ऑलोम्पिक ग्रामपंचायत जिल्हा स्तरावर खेळवले गेले. मुमल च्या म्हणण्यानुसार अंतिम सामन्यात तिचा संघ चुरशीच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात आपले कौशल्य दाखवत तिने नाबाद २५ धावा केल्या आणि चार सामन्यात सात गडी बाद देखील केले.
मुमल च्या सोबत तिची चुलत बहिण तिला साथ देते. ती तिच्या पेक्षा मोठी आहे. तिला देखील क्रिकेटच्या टिप्स माहित आहेत ज्या मुमल ला शिकवतात. अनिसाची निवड चैलेंजर क्रिकेट ट्रॉफी अंडर १९ राजस्थान संघात झाली त्यामुळे मुमलची क्रिकेटमधील आवड आणखी वाढली आहे. क्रिकेट बद्दल चे मुमल चे प्रेम एवढे आहे कि ती मुलांच्या सोबत देखील खेळते. मुमल चे प्रशिक्षक रोशन खान सांगतात कि मुमल च्या खेळाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आशा आहे कि आता सरकार या लहान खेळाडूंच्यासाठी योग्य व्यासपीठ देऊन त्यांच्या टेलेंट चा वापर करेल जेणेकरून ती पुढे जाऊन राजस्थान ला अभिमान वाटेल.
गेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयम वर झालेल्या चाचणीत गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. अनिसा समाज आणि जिल्यातील पहिली मुलगी आहे ती राज्यस्तरीय संघात क्रिकेट खेळलेली आहे. आता मुमल तिच्या पासून प्रेरित आहे. तिला देखील क्रिकेट मध्ये पुढे जायचे आहे. परंतु साधन आणि सामग्री दोन्हीच्या अभावामुळे तिला पुढे जाता येत नाही.
तरीदेखील मुमल ने माघार घेतली नाही. मुमल चा व्हायरल व्हिडीओ पाहून बीजेपी प्रदेश अध्यक्ष सतीश पुनिया, केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी आणि पालीचे खासदार पीपी चौधरी यांच्यासह अनेक युजर्स ने त्यांच्या सोशल मिडिया अकौंट वर पोस्ट करून तिची प्रशंसा केली.
Kal hi toh auction hua.. aur aaj match bhi shuru? Kya baat hai. Really enjoyed your batting. 🏏👧🏼#CricketTwitter #WPL @wplt20
(Via Whatsapp) pic.twitter.com/pxWcj1I6t6
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2023