तेलुगु अभिनेता शरवानंद आता त्याच्या जीवनात एक नवीन वाटचाल करणार आहे. अभिनेत्याने अमेरिकास्थित रक्षिता सोबत साखरपुडा केला आहे. याची माहिती अभिनेत्याने स्वतः सोशल मिडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. त्याच्या साखरपुड्यामध्ये फक्त जवळचे मित्र पाहुणे आणि साउथ मधील काही सेलिब्रिटी हजर होते.
अभिनेता शरवानंद आणि रक्षिता यांच्या साखरपुड्यामध्ये अभिनेता राम चरण त्याची पत्नी उपासना कोनिडेला सोबत पोहोचला होता तर राणा दग्गुवाती देखील कार्यक्रमामध्ये दिसला. नागार्जुन त्याच्या पत्नीसोबत पार्टी मध्ये पोहोचला होता आणि त्यांनी सोबत काही पोज देखील दिल्या.
शरवानंद ने इंस्टाग्राम वर त्याचे फोटो शेअर करत सोबत लिहिले, ‘माझ्या खास रक्षिता ला भेटा. या सुंदर मुलीसोबत माझ्या आयुष्याचा मोठा निर्णय घेत आहे.तुमच्या अशिर्वादाची गरज आहे’. त्यानंतर लोकांनी कमेंटचा पाऊस पडला आहे आणि त्यांनी खूप साऱ्या आशीर्वादा सोबत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
साउथ अभिनेत्याच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने आयोजित केला गेला होता. त्यांची रिंग सेरेमनी हैदराबाद मध्ये आयोजित केली गेली होती. समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. त्यादरम्यान दोघे पारंपारिक वेशभूषेत दिसत होते.
शरवानंद ची पत्नी रक्षिता त्यादरम्यान खूप सुंदर दिसत होती. तिने पेस्टल निळ्या रंगाची साडी घातली होती. सोबत अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. फोटो मध्ये दोघांचा लुक पाहताच आवडू लागतो. त्यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो मध्ये पाहू शकता कि शरवानंद आणि रक्षिता एकमेकांचे हात पकडलेले दिसत आहेत. दोघांच्यात कमालीची बॉंन्डींग पाहायला मिळत आहे. जे चाहत्यांची मने जिंकत आहेत. त्यांच्या जोडीवर चाहते खूप प्रेम दाखवताना दिसत आहेत.
जर आपण रक्षिता रेड्डी बद्दल बोलाल तर ती यूएसए मधील सर्वोत्तम तंत्रज्ञ आहे. ती आंध्रप्रदेश मधील राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे. तिचे वडील मधुसूदन रेड्डी आंध्रप्रदेश च्या हायकोर्ट मधील एक प्रसिद्ध वकील आहेत. तसेच तिचे आजोबा दादा गोपाल रेड्डी एक राजकीय व्यक्ती होते. आता शरवानंद आणि रक्षिता यांच्या लग्नाबद्दल बोलाल तर अजून त्यांच्या लग्नाची तारखेची बातमी दिली नाही. त्याव्यतिरिक्त अभिनेता त्याच्या व्यावसायिक जीवनात देखील खूप व्यस्त आहे. शेवटचे त्याला चित्रपट ‘ओकी ओका जीविथम’ मध्ये पाहिले गेले होते. हा त्याचा तेलुगु चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक कृष्णा चैतन्य आहेत. त्याव्यतिरिक्त शरवानंद च्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल सांगण्यात येत आहे कि तो लवकरच राशी खन्ना सोबत चित्रपट करताना दिसणार आहे. याबद्दल लवकरच सांगितले जाईल.
View this post on Instagram
View this post on Instagram