HomeEntertainmentसाऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टारने केले अनुषा शेट्टीसोबत लग्न, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टारने केले अनुषा शेट्टीसोबत लग्न, लग्नाचे फोटो सोशल मिडियावर अगीसारखे व्हायरल…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार नागा शौर्य आणि अनुषा शेट्टी विवाहबंधनामध्ये अडकले आहेत. २० नोव्हेंबर रोजी बंगळूरमध्ये त्यांचे लग्न झाले. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध तेलगु अभिनेता नागा शौर्यने सोशल मिडियावर त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड आणि इंटिरियर डिझायनर अनुषा एन शेट्टीला मंगळसूत्र घातलेले फोटो शेअर केले आहेत.

रविवारी बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये नागा शौर्य आणि अनुषा शेट्टीने लग्न केले. सोशल मिडियावर दोघांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन आणि लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये कपल खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो शेयर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये माझ्या आजीवन जबाबदारीची ओळख करून देत आहे असे लिहिले आहे. लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर येताच ते तुफान व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर चाहते आणि सेलेब्स त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.

त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन १९ नोव्हेंबर रोजी झाले ज्यामध्ये मेहंदी सेरेमनी आणि कॉकटेल पार्टी देखील होती. फोटोमध्ये नागा निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसला तर अनुषाने फुलांची नक्षी असलेला लेहेंगा घातला होता. लग्नासाठी त्याने धोतरासह पांढरा कुर्ता घातला होता आणि अनुषा पारंपारिक शैलीत सोनेरी नक्षीदार साडी, भारी दागिने आणि केसांमध्ये गजरा घातलेली दिसली.

लग्नानंतर ते मित्रांसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत. अभिनेता नागा नुकतेच कृष्णा वृंदा विहारी चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचबरोबर तो आता रंगबली चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे, ज्याचे शुटींग लवकरच सुरु होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naga Shaurya (@actorshaurya)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts