फेमस टीव्ही सिरीयल ये है मोहब्बतें मधी रुही तर तुम्हाला माहितीच असेल. काही दिवसांपूर्वी तिने मुंबईमध्ये घर खरेदी केल्यामुळे खूपच चर्चेत आली होती. अभिनेत्री वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घर केले आहे. रुहीचे चाहतेच नाही तर तिच्या पॅरेंट्स देखील हि प्राउड मुमेंट होती.
इतक्या कमी वयामध्ये अभिनेत्रीने स्वतःचे घर खरेदी केले आहे हि खूपच मोठी बाब आहे. रुहीचे रियल लाईफ नाव रुहानिका धवन आहे. अभिनेत्रीने सोशल मिडियावर चाहत्यांसोबत आपल्या गृहप्रवेशाचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कजिन्स आणि कुटुंबियांसोबत पूजा करताना दिसत आहे.
यासोबत रुहानिकाने एक स्वीट नोट देखील इंस्टाग्रामवरून शेयर केली आहे. मॉमसोबत रुहानिकाने सेम कलरचे आउटफिट घातले आहेत. घराच्या प्रवेशद्वारावर ती चुलत भावांसोबत पोज देत आहे. अभिनेत्रीचे आलिशान घर झेंडूच्या फुलांनी अतिशय सुंदरपणे सजलेले आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेयर करत रुहानिकाने लिहिले आहे कि मी देवाचे माझ्या प्रियजनांसाठी, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या भविष्यासाठी, माझ्या प्रत्येक चांगल्या आई वाईट दिवसांसाठी मी देवाचे आभार मानते. मी नेहमी माझे मस्तक माझे देव, गुरु, आईवडील आणि धरतीसाठी झुकवत राहीन.
रुहानिकाच्या या पोस्टवर तिच्या आईने प्रेमाचा वर्षाव केला आहे. यासोबत रुहानिकाच्या इंडस्ट्रीमधील फ्रेंड्स आणि चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुहानिका धवनने १ जानेवारी २०२३ म्हणजे न्यू ईयरच्या दिवशी आपल्या चाहत्यांना सांगितले होते कि तिने एक आलिशान घर खरेदी केले आहे.
याचे संपूर्ण क्रेडीट तिने तिच्या आईला दिले होते. रुहानिकाचे म्हणणे होते कि तिने पैसे कमवून तिच्या आईला दिले होते आणि त्याचे डबल कसे करायची ते तिलाच माहित. मम्मीमुळेच तिने इतक्या कमी वयामध्ये घर खरेदी केले आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर रुहानिका धवन टीव्हीच्या अनेक सिरियल्समध्ये दिसली आहे. यामधील ये है मोहब्बतें आणि ये है चाहतें मधून ती जास्त लोकप्रिय झाली.
View this post on Instagram