टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकची बहिण ज्योतिका दिलैक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या हळदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. छोटी बहु आणि शक्ती सारख्या टीव्ही शोमध्ये काम करणारी रुबिना दिलैकची बहिणी ज्योतिका दिलैक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
लग्नाच्या अगोदर ८ मार्च २०२३ रोजी ज्योतिका दिलैकची हळदी सेरेमनी होती. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. रुबीना दिलैक पासून ज्योतिका दिलैक पर्यंत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हळदी सेरेमनीचे फोटो शेयर केले आहेत.
फोटोमध्ये होणारी नवरी ज्योतिका आपल्या हळदीला एंजॉय करताना पाहायला मिळत आहे आणि फुल ऑन डांसच्या मूडमध्ये दिसत आहे. हळदीच्या आउटफिटमध्ये ज्योतिका खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिंक कलरचा सूट घातला होता, ज्याला तिने व्हाईट पायजमासोबत पेयर केले होते.
ज्योतिकाने आपल्या लुकला गुलाबी बांगड्या माथा पट्टीने पूर्ण केले होते. मिनिमल मेकअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तर ज्योतिकाच्या होणाऱ्या नवऱ्याने आपल्या लेडीलवला ट्विन केले होये. पिंक-व्हाईट कुर्ता-पायजामामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. रुबिना दिलैकने बहिणीच्या हळदी सेरेमनीमध्ये यलो कलरचा सूट घातला होता तिने मिनिमल ज्वेलरी, गॉगल्स आणि कमी मेकअप केला होता.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram