HomeEntertainmentअँड ऑस्कर अवॉर्ड गोज टू...'नाटु नाटु' आणि रामचरण- ज्युनियर एनटीआर आनंदाच्या...

अँड ऑस्कर अवॉर्ड गोज टू…’नाटु नाटु’ आणि रामचरण- ज्युनियर एनटीआर आनंदाच्या भरात नाचू लागले…व्हिडीओ व्हायरल…

मोठ्या स्क्रीनवर एकामागून एक गाणी दाखवली जात होती, आपले नाव ऐकण्याची उत्सुकता, नंतर नाटु नाटुचे नाव, आणि आनंदाच्या भरात रामचरण- ज्युनियर एनटीआर नाचू लागले आणि एकमेकांना मिठी मारू लागले. सोमवारचा दिवस भारतीय मनोरंजन क्षेत्रासाठी खूपच खास होता. ऑस्कर अवॉर्ड २०२३ मध्ये भारतीयांचा जलवा राझीला. बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री, बेस्ट सॉन्ग आणि दीपिका पदुकोनचा अंदाज अवॉर्ड सेरेमनीचे टॉकिंग पॉइंट बनला होता.

सोमवारची सकाळ ऑस्कर अवॉर्ड २०२३ मुळे खूपच चर्चेमध्ये होती. सर्वात पहिला जेव्हा बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीसाठी द एलिफेंट व्हिस्परर्सची घोषणा झाली तेव्हा सर्वांचे मन आनंदाने भरून आले. यानंतर एसएस राजामौलीच्या आरआरआर चित्रपटामधील नाटु नाटु गाण्यासाठी खूपच अपेक्षा वाढल्या होत्या. नाटु नाटुला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर मिळताच वातावरण पूर्णपणे बदलून गेले.

एमएम किरावनी यांनी संगीतबद्ध केलेले नाटु नाटु हे गाणे संपूर्ण आरआरआर चित्रपटाच्या टीमसाठी खास आहे. आतापर्यंत या गाण्याला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. आता या खास गाण्याला ऑस्कर देखील मिळाला आहे. ऑस्कर मिळण्याचा एक खास व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि खूपच आनंदाचा क्षण दिसत आहे. जेव्हा बेस्ट सॉन्गच्या नावाच्या घोषणा होते आणि आरआरआरचे मुख्य अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआर एकमेकांना मिठी मारतात. पूर्ण हॉलमध्ये नाटु नाटु गाणे वाजू लागते.

सोशल मिडियावर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोन इमोशनल झालेली दिसत आहे. बेस्ट सॉन्गची घोषणा होण्याअगोदर ती उत्सुकतेने बसली होती आणि जसे नाटु नाटुची घोषणा होते तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून जातात. तिच्या डोळ्यांमध्ये आनंद स्पष्ट पाहायला मिळतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts