आरआरआर चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या वक्तव्याने सोशल मिडीयावर पुन्हा एकदा साउथ विरुद्ध बॉलीवूड वादाला तोंड फुटले आहे. अलीकडेच अमेरिकेत आरआरआर च्या स्क्रीनिंग दरम्यान एसएस राजामौली म्हणाले, ‘आरआरआर हा बॉलीवूड चित्रपट नाही’. चित्रपट निर्माता राजामौली यांच्या या विधानावरून जोरदार खळबळ उडाली आहे.
एसएस राजामौली ने डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका येथे ‘आरआरआर’ च्या स्क्रीनिंग दरम्यान या चित्रपटाबद्दल बोलत होते. राजामौली ने याचदरम्यान म्हणाला कि, ‘आरआरआर हा बॉलीवूड चित्रपट नाही. हा भारतातील साउथ मधील एक तेलुगु चित्रपट आहे, जिथून मी आलेलो आहे. परंतु मी गाण्याचा वापर चित्रपटाला विराम देण्यासाठी आणि संगीत आणि नृत्य दाखवण्यासाठी नाही तर कथा पुढे नेण्यासाठी करतो’.
एसएस राजामौली ने त्यासोबतच सांगितले कि, ‘जर चित्रपटाच्या शेवटी तुम्ही म्हणाल कि मला तीन तास कसे गेले समजले नाही तर मला माहित आहे कि मी एक यशस्वी निर्माता आहे. राजामौली च्या याच विधानानंतर सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे. नेटीजंस पुन्हा एकदा साउथ विरुद्ध बॉलीवूड करू लागले आहेत.
‘आरआरआर’ च्या नाटू-नाटू गाण्याने ८० व्या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. या गाण्याबद्दल लोकांचे म्हणणे आहे कि हे गाणे एवढे देखील खास नाही कि त्याला अवोर्ड मिळावा. तर ‘नाटू नाटू’ गाणे ऑस्कर साठी देखील नॉमिनेटेड आहे. अशा परिस्थितीत लोक कमेंट करण्यात लागलेले आहेत.
The winner for Best Song – Motion Picture is @mmkeeravaani for their song “Naatu Naatu” featured in @rrrmovie! Congratulations! 🎥✨🎵 #GoldenGlobes pic.twitter.com/ePaXzJ1AoL
— Golden Globe Awards (@goldenglobes) January 11, 2023