HomeCricketचौथ्या टेस्ट दरम्यान मैदानावरच भडकला रोहित शर्मा, ईशान किशनला मारली थप्पड...व्हिडीओ व्हायरल...

चौथ्या टेस्ट दरम्यान मैदानावरच भडकला रोहित शर्मा, ईशान किशनला मारली थप्पड…व्हिडीओ व्हायरल…

भारतीय क्रिकेट टीम आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉर्डर गावस्कर सीरीजची चौथी टेस्ट खेळली जात आहे. अहमदाबादमध्ये टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतक ठोके. यादरम्यान एक घटना देखील घडली जेव्हा भारतीय टेस्ट टीमचा कप्तान रोहित शर्मा ईशान किशनच्या मागे धावताना पाहायला मिळाला.

भारतीय टेस्ट टीमचा कप्तान रोहित शर्मा जेव्हापासून नेतृत्व सांभाळत आहे तेव्हा पासून तो इतर खेळाडूंवर भडकतान दिसतो. तो आजच्या खेलादार्म्यान देखील मैदानावर ईशान किशनवर भडकलेला पाहायला मिळाला. वास्तविक ईशान किशन ड्रिंक्स ब्रेकदरम्यान ड्रिंक्स घेऊन आला होता. पण जातेवेळी तो घाईघाईने रोहित शर्माची पाण्याची बाटली घेऊन जाण्यास विसरला. ज्यामुळे रोहित शर्मा मस्करीमध्ये त्याला मारण्यासाठी धावू लागला.

मैदानावर जेव्हा हे सर्व होत होते तेव्हा भारतीय कप्तान रोहित शर्मासोबत रवींद्र जडेजा देखील उभा होता. हे पाहून त्याला हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला. ट्विटरवर हा व्हिडीओ शेयर केला आहे आणि भारतीय क्रिकेट प्रशंसकाना हा व्हिडीओ खूपच पसंद येत आहे आणि लोक हा व्हिडीओ खूप शेयर करत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २५५ धावा बनवल्या आहेत. ऑस्ट्रेलिया कडून उस्मान ख्वाजाने पहिल्या दिवशी शतक ठोके आणि सध्या तो १०४ धावा बनवून क्रीजवर टिकून आहे. त्याच्यासोबत कॅमरून ग्रीन ४९ धावा बनवून खेळत हे. भारतीय टीमकडून मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts