भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एकदिवसीय मालिका सुरु आहे. सध्या रोहित शर्मा पत्नी रितिकाचा भाऊ कुणालच्या लग्नामध्ये व्यस्त आहे. या कारणामुळे तो पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाही. सध्या रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो पत्नी रितिकासोबत डांस करताना दिसत आहे. असे म्हंटले जात आहे कि रोहितचा हा डांस व्हिडीओ त्याच्या मेहुणा कुणालच्या वेडिंग फंक्शनमधला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि भारतीय टीमचा पाप्तन रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह स्टेजवर डांस करत आहेत. या व्हिडीओमध्ये रोहितने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे तर त्याने यासोबत लाल रंगाचा दुपट्टा घेतला आहे. तर रोहितची पत्नी रितिका देखील या व्हिडीओमध्ये डांस करताना दिसत आहे. रोहित आणि रितिकाचा हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्यांना रोहित शर्माचा हा व्हिडीओ खूपच पसंद येत आहे. याआधी रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेहचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये तो त्याच्या मेहुण्याच्या हळदी सेरेमनीमध्ये सामील झालेला पाहायला मिळाला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळताना दिसला होता. हार्दिकने पहिल्यादाच वनडेमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले. याआधी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाची कमान सांभाळली आहे.
Rohit Sharma’s dance at his brother-in-law’s marriage. pic.twitter.com/TTqalgeQH2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2023