HomeBollywoodतरून दिसण्यासाठी मुलीला इंजेक्शन दिले म्हणणाऱ्या ट्रोलर्सला रीवा अरोराच्या आईने दिले असे...

तरून दिसण्यासाठी मुलीला इंजेक्शन दिले म्हणणाऱ्या ट्रोलर्सला रीवा अरोराच्या आईने दिले असे उत्तर, म्हणाली; ती १० वी मध्येच…

अभिनेत्री रीवा अरोरा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. तिला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. वास्तविक रीवाने अभिनेता करण कुंद्रासोबत एक रोमँटिक रील व्हिडिओ शेअर केला होता जो नंतर तिने हटवला. पण हा व्हिडीओ अनेक फॅन पेजवर उपलब्ध आहे. या व्हिडीओमुळे सध्या ती चांगलीच अडचणीमध्ये आली आहे.

सोशल मीडिया यूजर्स तिला तिच्या वयामुळे ट्रोल करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे कि रीवा फक्त १२ वर्षाची आहे आणि तिच्यापेक्षा ४० वर्षाने मोठ्या अभिनेता करण कुंद्रासोबत रोमँटिक व्हिडिओ बनवत आहे. वाढती ट्रोलिंग पाहून रीवाची आई निशाने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि रीवाच्या वयाबद्दल ज्या चर्चा होत आहेत त्याला तिने चुकीचे म्हंटले आहे.

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले कि कोणत्याही पडताळणीशिवाय एका यंग मुलीबद्दल अशाप्रकारची चुकीची माहिती पसरवली जात आहे. माझी मुलगी १० वीमध्ये शिकत आहे, ती इंडस्ट्रीमध्ये १३ वर्षांपासून काम करत आहे. आणि तिने आपल्या मेहनत आणि ईमानदारीने खूप काही मिळवले आहे.

याशिवाय निशा अरोराने इंस्टा स्टोरी देखील शेयर केली आहे. इंस्टा स्टोरीमध्ये तिने लिहिले आहे कि मी शांत होते, पण आता नाही, माझ्या मुलीच्या वयाबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या चुकीच्या आहेत. ते म्हणतात न चुकीची बातमी वेगाने पसरते आणि अनेक मिडिया चॅनेलनेही हे प्रुव्ह केले आहे. कमीत कमी चुकीची बातमी शेयर करण्यापूर्वी माझ्याकडून एकदा खात्री करून घायची होती. माझी मुलगी अभिनेत्री आहे आणि अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riva Arora (@rivarora_)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts