उरी: द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री रीवा अरोरा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. तिचे इंस्टाग्रामवर १० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. अभिनेत्रीने यावर आनंद व्यक्त केला आहे आणि इतके फॉलोअर्स झाल्यामुळे तिला खास गिफ्ट देखील मिळाले आहे. तिच्या आईने तिला हे गिफ्ट दिले आहे.
रीवा अरोरा नुकतेच छतरीवाली चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. चित्रपटामधील तिच्या कामाचे खूपच कौतुक झाले होते. ती आता १३ वर्षाची झाली आहे आणि तिची लोकप्रियता खूपच वाढली आहे. रीवा अरोराचे इंस्टाग्रामवर एक करोड पेक्षा जास्त १ करोड फॉलोअर्स पूर्ण झाल्यामुले तिची आई निशा अरोराने तिला एक ऑडी कार गिफ्ट दिली आहे.
या ब्लॅक ऑडी क्यू३ कारची किंमत ४४ लाख रुपये आहे. रीवाने कारसोबत आपले काही फोटो शेयर करत घरामध्ये नवीन बाल आले आहे, मला माहिती आहे कि वेळ झाला आहे पण शेवटी मी १० मिलियन इंस्टा फॅमिलीचे सेलेब्रेशन नवीन गिफ्टसोबत केले.
रीवा अरोराने खूप खूप आभार असे लहिले आहे. तिने पुढे लिहिले आहे कि मी माझा आनंद शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तुमच्या समर्थनासाठी खूप खूप आभार. रीवा अरोराने फोटो शेयर करताच त्यावर लगेच चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. तर काही लोकांनी तिला ट्रोल देखील करायला सुरुवात केली.
१३ व्या वर्षी नवीन कार खरेदी केल्यामुळे लोकांनी तिला विचारले कि तुझ्याकडे लायसन आहे का. तर एका युजरने अभिनंद, पण तुला अजून सहा वर्षे वाट पहावी लागेल असे लिहिले आहे. १३ व्या वर्षी यंग आणि ग्लॅमरस दिसत असल्यामुळे तिला लोकांनी खूपच ट्रोल केले होते. चित्रपटांव्यतिरिक्त रीवा अरोरा अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील करते. तिला रील्स आणि फोटोशूट करायला खूप आवडते.
View this post on Instagram