HomeEntertainmentरितेश देशमुख भर कार्यक्रमात पडला जिनिलियाच्या पाया...व्हिडीओ व्हायरल...

रितेश देशमुख भर कार्यक्रमात पडला जिनिलियाच्या पाया…व्हिडीओ व्हायरल…

मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये रितेश आणि जेनेलियाची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक मानली जाते. इंडस्ट्रीमध्ये कपलला पॉवर कपल म्हणून देखील ओळखले जाते. दोघांच्या लग्नाला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या अगोदर दोघांनी ९-१० एकमेकांना डेट केले. सध्या रितेश आणि जेनेलियाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे जो झी मराठीच्या एका कार्यक्रमादरम्यानचा आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि रितेश देशमुख जेनेलियाच्या पाया पडत आहे. वास्तविक झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या रितेश देशमुखने मंचावर जेनेलियाचे पाय धरले. झी मराठी कडून एक प्रमोशन व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यामध्ये श्रेयस तळपदे आणि निलेश साबळे होस्टिंग करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान श्रेयस रितेश देशमुखला प्रश्न विचारतो कि ‘सुखी संसाराचं रहस्य काय आहे?’ यावर मजेशीर देत रितेश म्हणतो कि ‘माणसाने चूक आपलीच आहे हे लवकर कबुल केलं पाहिजे’ आणि त्यानंतर तो जेनेलियाच्या पाया पडतो. यावेळी श्रेयस अशी घोषणा करतो कि रितेश जेनेलियाला घाबरतो.

यानंतर मंचावर उपस्थित असलेले सार्वजन वेद चित्रपटामधील वेड लावलंय गाण्यावर डांस करू लागतात. रितेश आणि जेनेलियाचा वेड चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांमध्ये त्यामध्ये बदल करून नवीन रोमँटिक गाणे सामील करण्यात आले होते. हे रोमँटिक गाणे रितेश आणि जेनेलिया यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

गाण्यामध्ये श्रावणी आणि सत्या यांच्या लग्नाचे क्षण दाखवण्यात आले होते. दरम्यान या गाण्यामध्ये ड्रीम सीक्वेन्समध्ये श्रावणी सत्याच्या पाया पडते आणि सत्याही तिच्या पाया पडतो. हा सीन दर्शकांना खूपच आवडला होता. ज्याची पुनरावृत्ती झी मराठीच्या मंचावर झालेली पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts