बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असतो. त्याचे जास्तीत जास्त चित्रपट हे विनोदी असतात. अभिनेता सर्व प्रकारच्या भूमिका उत्तम प्रकारे साकारतो. तो कायम त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. हेच कारण आहे कि रितेश देशमुखचे नाव नेहमीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणले जाते.
तो त्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला अशा प्रकारे वाहून नेतो कि लोक त्याची प्रशंसा करताना थांबत नाहीत. रितेश देशमुख त्याच्या भूमिकेबद्दल नवीन प्रयोग करण्यासाठी देखील ओळखला जातो. अलीकडे रितेश ला एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल विचारले तर अभिनेत्याने काय उत्तर दिले पाहूया.
रितेश देशमुख सध्या त्याचा मराठी चित्रपट वेड ला घेऊन चर्चेत आला आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत सलमान खान देखील पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहे. अलीकडे अभिनेत्याने सांगितले कि अलीकडच्या काळामध्ये चांगले प्रोजेक्ट्स चा भाग बनण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आजच्या संस्कृती आणि समाजाशी संबंधित असलेल्या कथांमध्ये गुंतणे. रितेश ने पुढे सांगितले कि मला वेगवेगळ्या पर्यायांसोबत प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे कारण कि मी खूप लवकर सुरुवात केली आहे.
अभिनेत्याला विचारले गेले कि परिस्थिती पाहून निर्णय बदलतो काय कि काही दिवसांनी जेव्हा त्यांची मुले त्यांचे चित्रपट पाहतील तेव्हा ते काय विचार करतील. त्याला उत्तर देताना अभिनेत्याने सांगितले – मी एक अभिनेत्याच्या रुपात स्वतः ला संतुष्ट करण्यासाठी चित्रपट केला आहे. रितेश ने सांगितले कि तो एकटा असा अभिनेता आहे, ज्याने ४ – ५ एडल्ट विनोदी चित्रपट केल आहेत. अभिनेत्याचे म्हणणे आहे कि त्याला याबद्दल खेद नाही.
रितेश ने पुढे सांगितले कि जेव्हा मी असले चित्रपट केले तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते. असले चित्रपट करणे माझी आवड होती. मला माझ्यासाठी गोष्टी निवडण्याचे स्वातंत्र्य होते. आई वडिलांनी कधी हे देखील सांगितले नाही कि मला काय करायला पाहिजे काय करायला नको. रितेश चा मराठी चित्रपट वेड मध्ये त्याची पत्नी जेनेलिया डिसोझा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. जेनेलिया च्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे देखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.