रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः वेडे केले आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगलीच चलती आहे. बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांसमोर वेड चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.
वेड चित्रपट रिलीज झाल्यानंतर उत्तम कामगिरी करत आहे. वेड चित्रपटाने सध्या दर्शकांना मनाला वेड लावलय असं म्हणायला काहीच हरकत नाही. दरम्यान रितेश देशमुखचे सध्या खूपच कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरभरून यशाबद्दल रितेश देशमुख भारावून गेला आहे. त्याने वेड चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे. रितेशने मोठी घोषणा करत म्हंटले आहे कि वेड चित्रपटामधील एक नवीन गाणे दर्शकांचा भेटीला येणार आहे.
विशेष म्हणजे हे गाणे सत्य आणि श्रावणीवर चित्रित करण्यात येणार आहे. हे गाणे दोघांच्या लव्हस्टोरीवर आधारित असणार आहे. आता दर्शकांना पुन्हा एकदा रितेश आणि जेनेलिया यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. रितेशने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे.
व्हिडीओमध्ये सत्याचा जिवलग मित्र त्याला जाणीव करून देतो कि वेड चित्रपटामध्ये सत्या आणि श्रावणीवर एकदेखील रोमँटिक गाणं नाही. यावर रितेश देशमुख म्हणतो कि सत्या आणि श्रावणीचे गाणे लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. व्हिडीओ शेयर करताना रितेशने ‘लवकरच येत आहे…’ असे कॅप्शन दिले आहे.
आता रितेशच्या देशमुखच्या घोषणेनंतर चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. काही वेळामध्येच रितेश देशमुखची हि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. रितेश जेनेलियाच्या वेड चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यामध्ये पदार्पण केले असून आतापर्यंत चित्रपटाने ४०.८५ करोडची कमाई केली आहे. आता लवकरच रितेशचा वेड चित्रपट ५० करोडचा आकडा पार करेल असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
View this post on Instagram