भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या रिकवरी मधून जात आहे. त्याने शुक्रवारी आपले काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते. पंत कुबड्याच्या सहाय्याने उभे राहिलेला दिसत होता. त्याच्या एका पायाला पट्टी बांधली आहे. पंतचा डिसेंबरमध्ये कार अपघात झाला होता. तो दिल्ली हून आपल्या घरी रूडकीला जात होता.
२५ वर्षाच्या रिषभ पंतने शुक्रवारी सोशल मिडियावर आपले दोन फोटो शेयर केले. फोटो शेयर करताना त्याने कॅप्शनमध्ये एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत असे लिहिले आहे. पंत कुबड्यांच्या सहाय्याने चालताना प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या उजव्या पायाला सूज दिसत आहे. तो फक्त एकाच पायावर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. अशामध्ये पंतच्या असह्य वेदनांचा अंदाज लावला जाऊ शकतो.
रिषभ पंत ३० डिसेंबर रोजी कार अपघाताचा शिकार झाला होता. घटनेनंतर त्याच्या कारला भीषण आग लागली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने पंतला त्वरित रूडकीच्या हॉस्पिटलमध्ये भरती करणायत आले होते. जिथून त्याला देहरादूनला शिफ्ट केले गेले. नंतर त्याला एयरलिफ्ट करून मुंबईला आणले गेले. हा खूपच गंभीर अपघात होता.
रिषभ पंतने आतापर्यंत ३३ टेस्ट, ३० वनडे आणि ६६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २५ वर्षीय रिषभने कसोटीत ५ शतके आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने २२७१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकं झळकावत ८६५ तर टी२० आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ६६ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसोबत एकूण ९८७ धावा झाल्या आहेत. तो गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता.
One step forward
One step stronger
One step better pic.twitter.com/uMiIfd7ap5— Rishabh Pant (@RishabhPant17) February 10, 2023