HomeViral२००१ मध्ये आतापेक्षा ५ पट स्वस्त मिळत होती चिकन आणि मटण बिर्याणी,...

२००१ मध्ये आतापेक्षा ५ पट स्वस्त मिळत होती चिकन आणि मटण बिर्याणी, व्हायरल झाले २२ वर्षे जुने मेन्यू कार्ड…

ते दिवस गेले जेव्हा जेव्हा तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांचा आस्वाद करणे स्वस्त आणि खिशाला परवडणारे होते. ९० च्या दशकामध्ये जन्मलेले लोक हे सहजपणे समजू शकतात. कारण या पिढीने सर्व परिवर्तन पाहिले आहेत. कीपॅड मोबाईल फोन्सपासून ते स्मार्ट फोनपर्यंत आणि सीआरटी टेलिव्हिजन सेटपासून ते स्मार्ट टेलिव्हिजनपर्यंत, ९० च्या दशकातील मुलांनी सर्व बदल पाहिले आहेत.

नुकतेच २००१ मधले एक रेस्टॉरंटचे मेनू कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये ९० च्या दशकातील मुलांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. व्हायरल होत असेल्या मेन्यू कार्डमध्ये उपलब्ध खाद्य पदार्थांची लिस्ट आणि त्याची किंमत पाहायला मिळत आहे.

चिकन बिर्याणी ज्याची किंमत आता जवळ जवळ १५० रुपये प्रती प्लेट आहे तेव्हा ३० रुपयांना मिळत होती. अशाचप्रकारे मटण बिर्याणी जी आता जवळ जवळ २५० रुपये प्रती प्लेट आहे ती २००१ मध्ये ३२ रुपयांना मिळत होती. २००१ मध्ये एग रोल, चिकन रोल, एग चिकन रोल, स्पेशल चिकन रोलची किंमत अनुक्रमे ७ रुपये, १० रुपये, १५ रुपये आणि २४ रुपये होती.

इंस्टाग्रामवर हे मेन्यू कार्ड शेयर केल्यानंतर या पोस्टला ३५०० पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत तर या फोटोमुळे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि हे मेन्यू कार्ड पुन्हा परत आले तर किती छान होईल. तर दुसऱ्याने लिहिले आहे कि १ मेन्यू = सध्या १ मेन्यू मधील एक इंस्टाग्राम. तर आणखी एका युजरने लिहिले आहे कि ते ७ रुपयांचे अंडा रोल ७० रुपयांचे अंडा रोल बनले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VULGAR SOCIETY🔥 (@vulgar_society)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts