HomeBollywoodरेखा इतकीच खूपच सुंदर आहे तिची बहिण राधा, पहा दिसते तिच्याइतकीच हुबेहूब...

रेखा इतकीच खूपच सुंदर आहे तिची बहिण राधा, पहा दिसते तिच्याइतकीच हुबेहूब…

रेखा ला हिंदी चित्रपट सृष्टीमधील खूपच सुंदर अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. केवळ १५ वर्षाच्या लहान वयापासून चित्रपट सृष्टीमध्ये तिने पाउल ठेवले होते. बॉलीवूड मध्ये रेखा ने काही वर्षातच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती आणि परत कधीही मागे वळून पाहिले नाही. रेखा लवकरच हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक उत्तम अभिनेत्री बनली.

रेखा ने तिच्या चांगल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत तसेच डान्स आणि सुंदरते ने देखील लोकांच्या मनात घर करण्यास यशस्वी झाली. रेखा जेवढी तिच्या व्यावसायिक जीवनामुळे चर्चेत होती तेवढीच ती तिच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील होती. तिचे अनेक अफेअर होते. लग्न देखील झाले. पती सोबत घटस्फोट देखील झाला. पती ने गळफास लावून घेतला. त्यानंतर देखील रेखा अजून देखील एखाद्या विवाहित स्त्री सारखी नटते.

रेखा अभिनेता पिता आणि अभिनेत्री आई यांची मुलगी आहे. ६८ वर्षीय रेखा चा जन्म १० ऑक्टोंबर १९५४ ला झाला आहे. तिच्या वडिलांचे नाव जेमिनी गनेसन होते जे एक दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीमधील एक प्रसिद्ध कलाकार होते. तसेच तिची आई पुष्पावल्ली देखील एक अभिनेत्री होती. आज आपण रेखा ची बहिण राधा च्या विषयी बोलणार आहोत जिला प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर ने चित्रपटाची ऑफर दिलेली होती.

लक्षणीय हे आहे की रेखा सारखेच तिची बहिण देखील खूपच अप्रतिम सुंदर आहे. एकेकाळी राधा मॉडेलिंग करत होती. तिला मॉडेलिंग एवढे आवडत होते की त्यासाठी तिने बॉलीवूड चित्रपटाची ऑफर नाकारली होती. राधा अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसलेली आहे. तसेच मॉडेलिंग वर देखील तिचे खूप प्रेम आहे. राधा ने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने त्यावेळी अनेक प्रसिद्ध मासिकांसाठी मॉडेलिंग देखील केले आहे. तिला चित्रपटांपेक्षा जास्त आवड मॉडेलिंग मध्ये आहे. तिची बहिण रेखा प्रमाणेच राधा ने देखील तिच्या सौंदर्याने लोकांना भुरळ घातलेली आहे.

साल १९७३ मध्ये आलेला चित्रपट ‘बॉबी’ मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया ने काम केले आहे. राज कपूर ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राज यांनी या चित्रपटासाठी आधी राधा ला निवडले होते. परंतु तिने या चित्रपटाला नकार दिला होता. रेखा ची बहिण राधा विवाहित आहे. तिच्या पतीचे नाव उस्मान सईद आहे. दोघे लहान पासून चांगले मित्र होते. लग्नानंतर पती सोबत राधा भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाली होती. दोघांना दोन मुले नावीद आणि अमन आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts