HomeBollywoodअभिनेत्याला कीस करताना सेटवर बेशुद्ध झाली होती रेखा, वयाच्या १३ व्या वर्षी...

अभिनेत्याला कीस करताना सेटवर बेशुद्ध झाली होती रेखा, वयाच्या १३ व्या वर्षी इतका ‘बो ल्ड’ सीन शूट करताना अशी झाली होती हालत…

रेखा ने तिच्या करिअर मध्ये खूप यश मिळवले आहे. तथापि तिच्या या यशा चा प्रवास म्हणावा तितका सोपा देखील नव्हता. जेव्हा रेखाला १३ वर्षांची असताना घरात मदत करण्यासाठी जबरदस्ती चित्रपटांमध्ये काम करावे लागत होते. रेखा तिच्या आई ला कायम म्हणायची की तिला चित्रपटांमध्ये काम करायचे नाही.

त्याच वर्षी १९६९ मध्ये रेखा ला एक चित्रपट ‘अंजाना सफर’ ची ऑफर होती तेंव्हा रेखा च्या आई ने तिला साउथ आफ्रिका फिरायला जाण्याचे आमिष दाखवून तयार केले होते, कारण की चित्रपटामधील काही दृश्ये तिथे चित्रीकरण करायचे होते. साउथ आफ्रिकेचा अनुभव खूप चांगला राहिला परंतु त्या नंतर चे चित्रीकरण मुंबई मध्ये होणार होते परंतु इथे तिचा अनुभव खूप चांगला नव्हता. तथापि, रेखा त्यावेळी खूप बऱ्यापैकी असायची आणि तिच्या आई कडून फिल्म निर्मात्यांना खास ताकीद असायची की तिला मोजून मापूनच जेवण द्यावे. त्यासोबतच रेखा ला मुंबई ची भाषा समजण्यास खूप अडचणी येत होत्या ज्यामुळे ती प्रतिसाद देत नसे.

तसेच, चित्रपट ‘अंजाना सफर’ मध्ये रेखा आणि त्यावेळचा प्रसिद्ध अभिनेता विश्वजित सोबत काम करायचे होते. या चित्रपटात एक किसिंग सीन चित्रित करायचा होता. जेव्हा या विषयी रेखा ला सांगितले तेंव्हा ती घाबरायला लागली आणि घाबरून तिने चित्रीकरणास करण्यास नकार दिला.

तथापि चित्रपटाच्या सगळ्या टीम ने समजावल्या नंतर खूप अडचणी नंतर रेखा या दृश्याला चित्रित करण्यास तयार झाली. मिडिया रिपोर्ट नुसार, जेव्हा हे दृश्य चित्रित केले जात होते, तेव्हा रेखा एवढी घाबरली होती की तिच्या चेहऱ्यावर भीती पाहायला मिळत होती. ज्यामुळे सीन चे सारखे रिटेक होत होते. यामुळे रेखा बेशुद्ध पडली होती. कोणत्या तरी किसिंग सीन मुळे अभिनेत्री बेशुद्ध होण्याची ही हिंदी चित्रपटातील पहिलीच वेळ होती.ही गोष्ट वाऱ्यासारखी मिडिया मध्ये पसरली आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच रेखा चर्चेत आली.

जेव्हा या चित्रपटाला सेन्सर बोर्डात पाठवण्यात आले तेंव्हा त्यांनी चित्रपट ‘अंजाना सफर’ मधील तो किसिंग सीन काढण्यास सांगितले. या कारणामुळे चित्रपट खूप वेळ प्रदर्शित होण्यापासून थांबला होता. यानंतर हा चित्रपट १-२ वर्ष नाही तर तब्बल १० वर्षानंतर १९७९ मध्ये ‘दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts