बॉलीवूड अभिनेत्री रेखा आज देखील तिच्या सौंदर्यामुळे लोकांच्या मनावर राज्य करते. तिची एक झलक मिळवण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. सध्या रेखाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर पडता पडता वाचलेली पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये रेखा पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे यादरम्यान ती हात जोडून वरती पाहत असते. दरम्यान तिची पोज बिघडते आणि ती अडखळते. यावेळी अभिनेत्रीची सेक्रेटरी तिला सांभाळताना पाहायला मिळत आहे. वास्तविक रेखा नुकतेच मुंबईच्या फ्रांसीसी फॅशन शो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती.
यादरम्यान अभिनेत्रीने गोल्डन आणि पर्पल कलरची बनारसी साडी घातली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्री हातामध्ये एक पोटली बॅग देखील कॅरी केली होती. त्याचबरोबर तिने भांगामध्ये सिंदूर, केसात गजरा आणि गळ्यामध्ये गोल्ड नेकलेस घालून आपला लुक कंप्लीट केला होता. रेखाच्या या लुकची खूपच चर्चा होत आहे.
क्रिश्चियन डॉयोरच्या या इवेंटला पहिल्यांदाच मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया वर आयोजित केले गेले आहे. या इवेंटच्या फॅशन शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला. रेखा व्यतिरिक्त अभिनेत्री अनुष्का शर्मा, श्वेता बच्चन, विराट कोहली, नताशा पूनावाला, करिश्मा कपूर, सोनम कपूर, मीरा राजपूत आणि अनन्या पांडे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
View this post on Instagram