हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिया रॉय कधी काळी अभिनेता शत्रुघ्न सिन्हासोबतच्या अफेयरमुळे चर्चेमध्ये राहत होती. आता पुन्हा एकदा रीना रॉय चर्चेमध्ये आली आहे. पण यावेळी तिचे नाव शत्रुघ्न सिन्हासोबत नाही तर त्याची मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत जोडले जात आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉयचा चेहरा खूप मिळताजुळता आहे. चेहरा मिळताजुळता असल्यामुळे लोकांना वाटते कि रीनाचा सोनाक्षी सिन्हाची खरी आई आहे. रीना आणि शत्रुघ्न सिंह यांनी बदनामीच्या भीतीमुळे हे सत्य जगासमोर येऊ दिले नाही.
रीना रॉयने सोनाक्षीच्या चेहरा मिळता जुळता असण्यावर नुकतेच वक्तव्य केले आहे. रीना रॉयने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि हा फक्त योगायोग आहे. कधी कधी असे होते कि जसे जितेंद्रची आई आणि तिची आई जुळ्या बहिणी वाटतात.
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय एकमेकांचे होऊ इच्छित होते पण अभिनेता आधीच विवाहित होता. तेव्हा रीना रॉयने शत्रुघ्न सिन्हाला अल्टीमेटम दिला होता कि जर तिच्यासोबत लग्न केले नाही तर ती ८ दिवसांमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करेल.
शत्रुघ्न सिन्हाला आपल्या मजबुरीमुळे रीना रॉयसोबत लग्न करता आले नाही. शत्रुघ्न सिन्हा पासून वेगळे झाल्यानंतर काही दिवसांमध्ये अभिनेत्री रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान सोबत लग्न केले होते पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले.