टिम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक रवींद्र जडेजा आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. रवींद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ ला गुजरात च्या जामनगर मध्ये जन्मलेला आहे. त्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने भारतासाठी तिन्ही फॉर्मेट मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तथापि, लवकरच रवींद्र जडेजा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टिम इंडियाचा दिग्गज स्टार ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती.
त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला आईपीएल मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्याने चेंडू आणि बैट ने सर्वांना थक्क केले. त्यानंतर त्याला वर्ष २००९ मध्ये राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. एकदिवसीय क्रिकेट च्या पहिल्या चार वर्षात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही.
परंतु वर्ष २०१३ मध्ये खेळल्यागेलेल्या चैम्पियंस ट्रॉफी च्या दरम्यान त्याने सर्वात जास्त फलंदाज बाद करून गोल्डन बॉल त्याच्या नावावर केला होता. तेव्हा पासून आजपर्यंत हा खेळाडू त्याच्या टिम साठी खूप चांगली कामगिरी करत आहे आणि भारतासाठी तिन्ही फोर्मेट मध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेट टिम चा स्टार ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा चे वडील अनिरुद्ध एका खाजगी कंपनी मध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते. रवींद्र जडेजाला सुरुवातीपासूनच क्रिकेटर बनायचे होते आणि त्याच्या करिअर च्या सुरुवातीला तो वडिलांना याबद्दल सांगण्यास घाबरत असे.
वर्ष २००५ मध्ये एका अपघातात त्याच्या आई चे निधन झाले. आई च्या निधनानंतर जडेजा ला एवढा मोठा धक्का बसला कि त्याने क्रिकेट पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर काही जणांच्या सल्ल्यानंतर त्याने पुन्हा क्रिकेट च्या मैदानावर पाय ठेवला आणि परत कधी मागे वळून पाहिले नाही.
विशेष म्हणजे गेल्या आईपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स च्या संघाने त्याला धोनीच्या स्थानावर त्यांचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. तथापि सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. अशातच अफवा येऊ लागल्या कि रवींद्र जडेजा आणि फ्रेन्चायजी यांच्यात काही मतभेत आहेत. अशातच रवींद्र जडेजा ने चेन्नई सुपर किंग्स च्या कर्णधार पदावरून राजीनामा दिला होता. त्यानंतर फ्रेन्चायजी ने महेंद्र सिंह धोनी ला पुन्हा संघाचा कर्णधार म्हणून निवडले.