रविना टंडनचे मानणे आहे कि एक महिलाच दुसऱ्या महिलेची शत्रू असते. त्याच एकमेकींना बॉडी शेमिंग करतात आणि अपमानित करतात. एका रिसेंट मुलाखतीमध्ये रविना टंडनने आपले इंडस्ट्रीमधील अनुभव शेयर केले. रविनाने सांगितले कि जेव्हा तिने स्वीकिंग कॉस्ट्यूम घालण्यास नकार दिला तेव्हा लोक तिला ऐरोगेंट म्हणून लागले. रे’प सीनसाठी देखील रविना टंडनने एक अट ठेवली होती कि, तिचे कपडे अस्ताव्यस्त होणार नाहीत. तिने म्हंटले कि ती पहिली अभिनेत्री होती जिने अशी पॉलिसी बनवली होती.
रविना टंडनने बॉलीवूडमधील बॉडीशेमिंगबद्दल देखील मत व्यक्त केले. ती म्हणाली कि पुरुष कलाकार जे देखील बोलतात ते शेवटचे असते. रविना म्हणते कि महिलाच त्यावेळी महिलांचा खऱ्या शत्रू असतात. त्या त्यांना अपमानित करण्यासाठी बॉडी शेमिंग करत होत्या, चारित्र्यवर बोट दाखवायच्या.
मुलाखतीमध्ये बोलताना रविना टंडनने सांगितले कि मी अनेक गोष्टींमुळे अनकंफर्टेबल राहायचे जसे डांस स्टेप्स. जर मी कोणत्याही गोष्टीवर अनकंफर्टेबल व्हायचे तेव्हा मी म्हणायचे कि कि हि स्टेप मी करणार नाही. मला स्वीमिंग कॉस्ट्यूम घालायचे नव्हते. मला किसिंग सीन करायचे नव्हते. मी अशी एकमेव अभिनेत्री होती जिच्यावर अनेक रे प सीन झाले पण कधी ड्रेस फाटला नाही. माझा ड्रेस फाटणार नाही, तुम्ही करा रेप सीन जर करायचा असेल तर.
रविना म्हणते कि सर्वात पहिला डर माझ्याकडे आला होता, तथापि तो वल्गर नव्हता. पण आधी डरमध्ये काही सीन होते ज्यावर मी अनकंफर्टेबल होते. मला स्वीमिंग कॉस्ट्यूम घालायचा नव्हता. मी म्हणाले होते कि मी स्वीमिंग कॉस्ट्यूम घालणार नाही. इतकेच नाही तर प्रेम कैदी, ज्यामधून लोलो (करिश्मा कपूर) लॉन्च झाली होती, आधी मला ऑफर झाला होता. पण यामध्ये एक सीन होता ज्यामध्ये हिरो तिची जीपर बंद करतो आणि स्ट्रिप दिसत आहे मी त्यामुळे कंफर्टेबल नव्हते.
रविना टंडनचा शेवटचा चित्रपट केजीएफ चॅप्टर २ होता. यानंतर ती संजय दत्तसोबत घुड़चढ़ीमध्ये दिसली होती. मुलाखतीदरम्यान तिने सांगितले कि संजय दत्त नेहमी तिचा क्रश राहिला आहे. तिची वेब सिरीज अरण्यकचा दुसरा पार्ट देखील येणार आहे. यामध्ये रविना टंडन अरबाज खान सोबत दिसणार आहे.