बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये बाबा महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. इथे तिने महाकालचे दर्शन घेतले. यादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री रवीने गर्भगृहामध्ये जाऊन महाकालचा अभिषेक देखील केला.
मंदिरातील गर्भगृहामध्ये पुजारी बालागुरुने रविना टंडनकडून महाकालची पूजा आणि अभिषेक करून घेतला. रविना तांद्ज्न जवळ जवळ अर्धा तास मंदिरामध्ये थांबली होती. यादरम्यान तिने नांदी हॉलमध्ये बसून ध्यान देखील केले. त्याचबरोबर मंदिराचे पुजारीने रविना टंडनच्या मस्तकी चंदनचा त्रिपुंड लावून आशीर्वाद दिला.
महाकालच्या दर्शनानंतर रविनाने मिडियासोबत बातचीत देखील केली. रविना टंडनने सांगितले कि तिने महाकाल समोर हि मनोकामना केली आहे कि सर्वजण खुश राहावेत. तिने म्हंटले कि इथे येऊन मला खूप चांगले वाटले आणि महाकालचे दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले.
तथापि जेव्हा रविना तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने इतकेच म्हंटले कि मंदिरामध्ये चित्रपटाबद्दल बोलणे चांगले नाही. महाकालच्या दर्शनासाठी देश-विदेशाम्धून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर परिसरातील विस्तारित क्षेत्रामध्ये बनलेल्या श्री महाकाळ महालोकच्या लोकार्पण नंतर जगभारातून उज्जैनला येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे.
Mahakal Temple : महाकाल दर्शन के लिए उज्जैन पहुंची अभिनेत्री रवीना टंडन#mpnews #mahakal #ujjain #raveenatandon #Nadunia https://t.co/7wQiFSdBsA pic.twitter.com/t83aZTgmnS
— NaiDunia (@Nai_Dunia) April 2, 2023