टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रतन राजपूत ग्लॅमर जगतामधील गुपित उघड केले आहे. अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो मधून घराघरामध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रतन राजपूत नेहमी चर्चेमध्ये असते. गेल्या काही दिवसांपासून ती टीव्ही पासून दूर आहे, पण सोशल मिडियाद्वारे ती चाहत्यांसोबत संपर्कात राहते. आता तिने एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने ग्लॅमर इंडस्ट्रीमधील वाढत्या आ त्मह त्येच्या घटनांबद्दल सांगितले आहे.
रतन राजपूतने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे, त्यामध्ये ती म्हणते कि इंडस्ट्री जी हालत सध्या आहे त्यावर बोलणे खूप गरजेचे आहे. ती म्हणते कि अशा अनेक केस आहेत ज्या पाहिल्यानंतर आपण म्हणतकि त्याने आ त्मह त्या करायला नको होती. हि स्टेप का घेतली. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला हादरवून सोडतात.
एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला लोक हाय क्लास मानतात. या हाय क्लास सोसायटीमध्ये छोटे छोटे लोक येऊन चमकतात. लो क्लासमध्ये मोकळेपणा आहे. यामुळे ते भांडणातात आणि पुन्हा कामावर फोकस करतात. ती पुढे म्हणाली कि मी पटना बिहारची आहे आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी जोडली गेली आहे. मी ती लाईफ पाहिली आहे ज्याची लोक स्वप्ने पाहतात.
ती लाईफ मी दुरून देखील पाहिली आहे आणि जवळून देखील. मी नेहमी रियल लोकांसोबत कनेक्ट राहते. फेक लोक मला पसंद नाहीत. या इंडस्ट्रीमध्ये घराची मोठी समस्या आहे, रेंट देण्यात समस्या आहेत. आता इंडस्ट्री हायफाय आहे तर लोक हाय क्लास दिसण्यासाठी आपली लाइफस्टाइल चेंज करतात आणि यासाठी ते लोक घेऊन अडचण भागवतात.
आता जरा विचार करून पहा कि या लोकांवर हाय क्लास दिसण्यासाठी किती बोजा असतो. वास्तविक कपडे आणि महागड्या गाड्यांनी हाय क्लास दिसत नाही तर आपल्या विचारसरणीने हाय क्लास दिसत असतो. अनेकवेळा हाय क्लास दिसण्याच्या चक्करमध्ये लोक आ त्मह त्या करतात आणि या घटना वाढत आहे.
ग्लॅमर इंडस्ट्रीत ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना देखील मिडियाला दाखवण्यासाठी पार्टी करायची आहे. भलेहि घराच्या रेंटसाठी पैसे नसतील पण हे दाखवायचे आहे कि मी किती हाय क्लास आहे. मी अशा लोकांना गायब होताना पाहिले आहे. कधी अशा गोष्टींचा बोजा मी माझ्यावर येऊ देत नाही. तिने चाहत्यांना देखील कोणत्याही गोष्टीचा लोड न घेण्यास सांगितले आहे.