बॉलीवूड अभिनेत्री जिथे आपल्या स्टाईलमुळे चर्चेमध्ये राहतात तिथे अनेकवेळा त्यांचा नो मेकअप लुक देखील कॅमेऱ्यामध्ये कैद होतो. मेकअपशिवाय अनेक अभिनेत्रींना ओळखणे देखील कठीण होते. अशामध्ये आता साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक नो मेकअप व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिकाचा लुक पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.
पुष्पा फेम एक्ट्रेस रश्मिका मंदाना नुकतेच विमानतळावर स्पॉट झाली. नेहमीप्रमाणे यावेळी देखील तिने आपल्या अंदाजामध्ये चाहत्यांची मने जिंकली. रश्मिका विमानतळावर नो मेकअप लुकमध्ये पाहायला मिळाली. या दरम्यान जेव्हा फोटोग्राफर्सनी तिला मास्क हटवून पोज देण्यास सांगितले तेव्हा तिने जरा देखील संकोच न करता फुल कॉन्फिडेंसमध्ये आपल्या सिंपल लुकमध्ये पोज दिल्या.
या व्हिडीओ मधील श्रीवल्ली अभिनेत्री रश्मिकाच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने सिंपल व्हाईट टी-शर्ट सोबत लेगिंस घातली होती. तिने आपल्या हातामध्ये फोन आणि मास्क पकडला होता. अभिनेत्रीने एक बॅग देखील घेतली होती, जी तिला खूपच सूट करत होती.
तिने आपले केस मोकळे सोडले होते आणि स्लिपर्स कॅरी केले होते. विमानतळावरवर रश्मिकाला सिंपल लुकमध्ये पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली. नो मेकअप लुकमध्ये रश्मिका खुच्फ सुंदर दिसत होती. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. यावर कमेंट करून चाहते तिच्या कौतुक करत आहेत.
एका युजरने कमेंट करून लिहिले आहे कि तुझ्यासारखी क्यूटनेस दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीमध्ये नाही. तर एकाने लिहिले आहे कि तू नो मेकअप लुकमध्ये देखील खूप सुंदर दिसतेस. तर एकाने लिहिले आहे कि तुझ्या साधेपणावर मी फिदा झालो आहे.
View this post on Instagram