HomeBollywoodरश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या नात्यासोबतचे दिले संकेत, चक्क रश्मिकाने विजयचा...

रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या नात्यासोबतचे दिले संकेत, चक्क रश्मिकाने विजयचा…

रश्मिका मंदाना सध्या आपला पहिला बॉलीवूड चित्रपट गुडबायच्या रिलीजनंतर व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अभिनेत्री काही दिवसांपूर्वी तिचा रयूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत मालदीवला जाताना एयरपोर्टवर स्पॉट झाली होती. ज्यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि हे रयूमर्ड स्टार कपल मालदीवमध्ये एकत्र सुट्ट्या घालवत आहे. यादरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदानाने मालदीवमधून आपले काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. ज्यानंतर तिच्या प्रत्येक फोटोमध्ये चाहते विजय देवरकोंडाची निशाणी शोधत आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने नुकतेच पूलमध्ये एन्जॉय करताना मालदीव व्हेकेशनचे फोटो शेयर केले होते. या फोटोमध्ये अभिनेत्री शांततेमध्ये वेळ घालवताना दिसत आहे. अभिनेत्री फोटोमध्ये मालदीवमध्ये टाईम स्पेंड करताना दिसत आहे. ज्याचे लेटेस्ट फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय थाटले आहेत.

पण यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या चाहत्यांची नजर तिच्या शर्टवर टिकून होती. या फोटोमध्ये अभिनेत्री बिकिनी लुकला मेल शर्टने कव्हर करताना दिसत आहे. चाहते असा अंदाज लावत आहेत कि हा विजय देवरकोंडाचा शर्ट आहे.

इतकेच नाही तर नुकतेच अभिनेत्रीचा हा फोटो देखील खूपच व्हायरल झाला होता ज्यामध्ये अभिनेत्रीने विजय देवरकोंडाचा चष्मा घातला असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर असाच चष्मा घालून अभिनेता विजय देवरकोंडा मालदीवला निघताना स्पॉट झाला होता.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील या दोन्ही कलाकारांची नावे अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत जोडली जात आहेत. तथापि हे रयूमर्ड कपल एकमेकांसोबत नेहमी आपला वेळ घालवताना दिसत असते. फिल्म स्टार रश्मिका मंदाना आपल्या ताज्या फोटोंने चाहत्यांना कंवेन्स करताना दिसत आहे कि ती एकटीच सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तथापि चाहत्यांना अभिनेत्रीच्या या सोलो फोटोंवर विश्वास बसत नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts