HomeViral'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या चंद्राची भुरळ, रश्मिकाने धरला लावणीवर ठेका...व्हिडीओ व्हायरल...

‘श्रीवल्ली’ला पडली मराठमोळ्या चंद्राची भुरळ, रश्मिकाने धरला लावणीवर ठेका…व्हिडीओ व्हायरल…

पुष्पा चित्रपटामधून घराघरामध्ये फेमस झालेली अभिनेत्री अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने कमी कालावधीमध्ये अमाप लोकप्रियता मिळवली आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर अभिनेत्रीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. पुष्पा चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलीवूडमध्ये देखील एंट्री केली आहे. बॉलीवूडमधील पहिल्याच चित्रपटामध्ये ती बिग बी अमिताभ बच्चनसोबत गुडबाय चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूसोबत देखील दिसली होती.

दरम्यान रश्मिकाचा झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती मराठी लावणीवर थिरकताना पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर तिने चंद्रा गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विशेष म्हणजे रश्मिकाने हि लावणी एका टेकमध्ये सादर केली आहे. सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्तेसोबत किस्से देखील शेयर करताना दिसणार आहे.

विशेष म्हणजे झी गौरवच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे कलाकार देखील आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गैरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts