रणबीर कपूर साठी मागील वर्ष हे खूप खास होते. जिथे प्रोफेशनली रणबीरने खूप दिवसांनी ‘ब्रह्मास्त्र’ नावाचा हिट चित्रपट दिला आहे, व्यक्तीशः त्याने खुपकाही मिळवले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट सोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पासून पती पत्नी आणि नंतर आई वडील बनण्यापर्यंतचा प्रवास रणबीर ने मागील वर्षी पूर्ण केला आहे.
अलीकडेच रणबीर काही मिटिंग निमित्त मुंबई मध्ये दिसला होता जेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या फोन च्या वॉलपेपर वर गेले. चकित होण्याची गोष्ट हि आहे कि रणबीर ने नाही त्याची मुलगी राहा कपूर चा फोटो लावला होता आणि नाही त्याची पत्नी आलिया भट्ट चा. कोण आहे, ज्याचा फोटो रणबीर च्या फोन च्या स्क्रीन वर आहे?
जर तुम्ही अजून अंदाज लावू शकला नसाल तर रणबीर कपूरने त्याच्या वॉलपेपर वर कोणत्या व्यक्तीचा फोटो लावला आहे चला तर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू. रणबीर अलीकडेच, एका मिटिंग साठी टी सिरीज च्या ऑफिस मध्ये पोहोचला होता जिथे सर्वांचे लक्ष त्याच्या फोन च्या लॉक स्क्रीन वर गेले. रणबीर च्या फोन च्या लॉक स्क्रीन वर त्याचे वडील, ऋषी कपूर यांचा एक खूपच क्युट फोटो आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये त्यांच्या ड्रिंक चा ग्लास आहे. अभिनेते ऋषी कपूर यांचे कैन्सरमुळे २०२० मध्ये निधन झाले होते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ने काही दिवसांआधी, मिडिया फोटोग्राफर्स आणि पैपराजी यांच्या साठी एक खास गेट टुगेदर ठेवला होता ज्यामध्ये रणबीर ने त्याच्या फोन वर त्याचा आणि आलिया ची मुलगी राहा कपूर यांचा पहिला फोटो सर्वाना दाखवला आणि त्यांना हि विनंती देखील केली कि राहा चा फोटो त्यांनी काढू नये. रणबीर आणि आलिया यांच्या सोबत नीतू कपूर देखील तिथे उपस्थित होत्या आणि त्यांनी सर्वांनी मीडियासाठी एक वेळ देखील सांगितली, ज्यानंतर ते राहा चे फोटो काढू शकतील.
View this post on Instagram