HomeBollywoodरणबीर-आलियाच्या मुलीचे नावाचे आजोबा ऋषी कपूरशी आहे खास कनेक्शन, नाव ऐकून...

रणबीर-आलियाच्या मुलीचे नावाचे आजोबा ऋषी कपूरशी आहे खास कनेक्शन, नाव ऐकून आजी नीतू कपूर झाली भावूक…

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अलीकडेच आई वडील बनले आहेत. आलिया ने ६ नोव्हेंबर ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया चे आई बनल्याबद्दल अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, सोशल मिडीयावर आलीयाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उतावळे होत आहेत. तथापि, आता पर्यंत आलिया आणि रणबीर ने मुलीचा कोणताही फोटो चाहत्यांना दाखवलेला नाही. परंतु बाळाच्या नावावरून एक नवी माहिती समोर आलेली आहे.

रिपोर्ट नुसार, आलिया आणि रणबीर यांचे बाळाच्या नावावरून एक नवीन खुलासा समोर आला आहे. रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे की आलिया आणि रणबीर ने त्यांच्या मुलीचे नाव शॉर्टलिस्ट केले आहे. या जोडीने त्यांच्या राज्कुमारीच्या साठी जे नाव सुचवले आहे त्या नावाचे आजोबा ऋषी कपूर यांच्या सोबत खास कनेक्शन असेल.

या जोडीने दिवंगत अभिनेता ऋषि कपूर यांच्या नावाला जोडून त्यांच्या मुलीचे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या एका जवळच्या साथीदाराने या गोष्टींची माहिती दिलेली आहे. मुलगा आणि सून यांच्या या निर्णयावर आजी नीतू कपूर खूपच भावनिक झाल्या होत्या. तथापि नाव काय ठेवायचे आहे याची अजून काही माहिती समोर आलेली नाही.

अंदाज लावला जात आहे की लवकरच रणबीर आणि आलिया जगासमोर त्यांच्या राजकुमारीच्या नावाची घोषणा करू शकतात. अलीकडेच आलिया भट्ट ने तिच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांचे चेहरे तर दिसले नाहीत, परंतु त्यांच्या हातामध्ये एक कप दिसत आहे. त्या कप वर ‘मामा’ लिहिले होते. या पोस्ट ला शेअर करताना अभिनेत्रीने कैप्सन मध्ये लिहिले की, ‘ही मी आहे’. त्यासोबतच तिने हृदयाची इमोजी पोस्ट केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts