HomeBollywoodलग्नाला १० वर्षे झाली तरी अजून आई झाली नाही राम चरण पत्नी,...

लग्नाला १० वर्षे झाली तरी अजून आई झाली नाही राम चरण पत्नी, म्हणाली; मला अजून…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता राम चरणचे देशभरात अनेक चाहते आहेत. आरआरआर चित्रपटामधून तर त्याने जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवली. राम चरणच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या लग्नाला आता १० वर्षे झाली आहेत.

उपासनासोबत त्याने लग्न केले होते. लग्नाला १० वर्षे लोटली असली तरी अजून राम चरण आणि उपासना आईवडील झालेले नाहीत. चाहते देखील त्याच्या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण राम चरणच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.

खुलासा करताना उपासना म्हणाली कि, अजून तरी मला आई व्हायचं नाहीय, यामागचे कारण देखील तिने स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या १७ व्या एटीए अधिवेशनामध्ये राम चरण आणि त्याच्या पत्नीने सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत बातचीत केली.

यादरम्यान उपसनाने मला अद्याप मुल नको आहे असे सांगितले. समाजामधील अनेक लोक आई कधी होणार असे प्रश्न विचारत असल्याचे देखील ती म्हणाली. वाढत्या लोकसंख्येच्या संतुलनासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे असे ती म्हणाली.

यावेळी सद्गुरूंनी उपासनाच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, मानवाला त्याच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्यांची नेहमीच चिंता आहे. पण जर मानवी पावलांचे ठसे कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंगचीही काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे असे निर्णय घेणाऱ्या स्त्रियांबद्दल नेहमी बरे वाटते.

अभिनेता राम चरणने देखील बाबा होण्याच्या निर्णयावर कोणताही विचार केला नसल्याचे सांगितले. दोघांनाहि सध्या मुल नको असल्याचे देखील तो म्हणाला. लोकप्रिय अभिनेता चिरंजीवीचा मुलगा असल्यामुळे त्याला चाहत्यांच्या मनोरंजनाची मोठी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी अजून मुलाचा विचार केलेला नाही.

उपासनाचे देखील काही प्लॅन्स केले आहेत त्यामुळे अद्याप यावर कोणताही विचार नाही. उपासना अपोलो चॅरिटीची वाइस प्रेसिटंड आहे आणि ती बी पॉझिटिव्ह मासिकाची संपादक म्हणून देखील काम करते. कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली होती नंतर १४ जून २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts