HomeEntertainmentइतक्या रुपयांमध्ये बनत होता रामानंद सागरच्या रामायणचा एक एपिसोड, कमाईचा आकडा जाणून...

इतक्या रुपयांमध्ये बनत होता रामानंद सागरच्या रामायणचा एक एपिसोड, कमाईचा आकडा जाणून आश्चर्याचा धक्का बसेल…

टीवी इंडस्ट्री मध्ये आत्ता पर्यंत ‘रामायण’ वर खूप मालिका बनल्या आहेत, परंतु १९८७ मध्ये सुरु झालेला रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ ची कोणीही बरोबरी करू शकत नाही. या मालिकेमध्ये अरुण गोविल ‘श्रीराम’ च्या भूमिकेत दिसले होते आणि त्यांच्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. अरुण गोविल श्रीराम च्या भूमिकेत एवढे शोभून दिसत होते की लोक इतक्या वर्षांनी देखील आज देखील त्यांना श्रीराम समजतात.

तसेच ‘सीता’ च्या भूमिकेत दीपिका चीखलीया आणि ‘रावण’ च्या भूमिकेत अरविंद त्रिवेदी दिसले होते. या लोकांनी रामायणात एवढा छान अभिनय केला होता की त्यावेळचे लोक आज पण ‘रामायण’ आणि त्यातील कलाकारांना विसरले नाहीत. आज आपण या मालिकेतील एक भाग बनवण्यासाठी किती खर्च येत होता हे जाणून घेऊया.

‘रामायण’ मध्ये अरुण गोविल, दीपिका चिखलीया आणि अरविंद त्रिवेदी सोबतच, सुनील लहरी देखील होते, ज्यांनी लक्ष्मण ची भूमिका केली होती. आत्ताच्या जमान्यात कोणत्याही मालिकेच्या एका भागाला बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च होतात आणि जेव्हा गोष्ट कोणत्यातरी धार्मिक मालिकेबद्दल असते तेंव्हा त्याचे बजेट देखील वाढत जाते. अशाप्रकारे देखील फायदा होतो. असे सांगितले जाते की ‘रामायण’ च्या एका भागाला बनवण्यासाठी नऊ लाख रुपये खर्च येत होता आणि या एका भागातूनच निर्मात्यांना ४० लाख रुपये कमाई होत होती. जर या कमाई ला जोडले गेले तर जवळपास ३० करोड रुपयांपेक्षा जास्त लागत होती.

रामानंद सागर याचे ‘रामायण’ ७८ भाग प्रसारित झाले होते आणि प्रत्येक भाग हा ३५ मिनिटांचा होता, या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्यावेळी असे वातावरण होते की ही मालिका जेव्हा जेव्हा टीवी वर प्रसारित होत होता तेंव्हा तेंव्हा रस्त्यावर शुकशुकाट होत असे. सांगितले जाते की प्रत्येक जण आपले काम सोडून ही मालिका पायाला बसत असत.

तथापि, ही मालिका भारत सोडून ५५ देशांमध्ये प्रसारित केला गेला होता. या मालिकेची व्युवरशीप त्यावेळी ६५० मिलियन होती. जे आज देखील एक रेकोर्ड आहे. या मालिकेचे नाव त्यावेळी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड’ मध्ये सर्वात जास्त पाहिली जाणारी धार्मिक मालिका म्हणून नोंद केले गेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts