HomeEntertainmentसाऊथ सुपरस्टार राम चरणने कॅन्सरग्रस्त लहानग्या मुलाची इच्छा केली पूर्ण, इमोशनल फोटो...

साऊथ सुपरस्टार राम चरणने कॅन्सरग्रस्त लहानग्या मुलाची इच्छा केली पूर्ण, इमोशनल फोटो आले समोर…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आणि आरआरआर चित्रपटामधून जगभरामध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता राम चरणने असे काही केले आहे कि सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. राम चरण सध्या त्याच्या आगामी अंटाइटल तेलगु-तमिळ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. पण त्याने आपल्या बीजी शेड्युलमधून वेळ काढून लहानग्या चाहत्यासाठी काही असे केले आहे ज्यामुळे तो सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे. सोशल मिडियावर सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

राम चरण फिल्म इंडस्ट्रीमधील असा अभिनेता आहे ज्याने फक्त चित्रपटासाठीच प्रेम मिळत नाही तर त्याच्या विनम्र स्वभावामुळे देखील त्याचे नेहमी कौतुक केले जाते. त्याच्या या स्वभाचाचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. जेव्हा अभिनेता आपल्या बीजी शेड्युल मधून वेळ काढून एका कॅन्सरग्रस्त लहानग्या चाहत्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

कॅन्सरग्रस्त असलेल्या ९ वर्षीय रावुला मणि कुशल आणि अभिनेता राम चरणचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये साऊथ स्टार राम चरणने या लहानग्या चाहत्याला सरप्राइज गिफ्ट देखील दिले. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो ट्वीटरवरून शेयर केले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये राम चरण लहानग्या रावुलासोबत खूपच मवाळकीने बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याला गिफ्ट देताना पाहायला मिळत आहे. आणखी एका फोटोमध्ये राम चरण खूपच प्रेमाने ९ वर्षीय लहानग्या चाहत्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts