तेलुगु स्टार राम चरण च्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली आनंदाची बातमी आहे. ‘मगधीरा’ आणि ‘आरआरआर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील स्टार च्या घरी लवकरच बाळाचा आवाज येणार आहे. राम चरण ची पत्नी उपासना गरोदर आहे आणि दोघे त्यांच्या पहिल्या बाळाची स्वप्ने पाहत आहेत.
राम चरण चे वडील आणि तेलुगु चित्रपटातील मेगास्टार चिरंजीवी ने स्वतः सोशल मिडीयावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चिरंजीवी ने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये भगवान हनुमान यांचा फोटो आहे आणि सोबत ही बातमी लिहिली आहे. या फोटो वर लिहिले आहे, ‘श्री हनुमान जी च्या कृपेने, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. प्रेम आणि आभार सोबतच सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला, शोभना आणि अनिल कामिनेनी’. चिरंजीवी च्या या पोस्ट वरून असे दिसत आहे की मेगास्टार ला आजोबा बनण्याचा किती आनंद होत आहे.
साउथ च्या मोठ्या स्टार्स पैकी एक राम चरण आणि उपासना कामिनेनी ने २०१२ मध्ये विवाह केला होता. ही जोडी लग्नाच्या दहा वर्षा नंतर त्यांच्या पहिल्या बाळासाठी गरोदर आहे. गरोदर पणाच्या बातमीला घेऊन याच वर्षी जुलै मध्ये उपासना खूप चर्चेत आलेली होती. तिने सांगितले होते की त्यांना अजून बाळ नको आहे. उपासना म्हणाली होती की त्यांनी रिप्रोड्यूस न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लोकांनी त्याचा सम्मान केला पाहिजे.
आपल्या निर्णयाच्या मागचे कारण सांगताना उपासना म्हणाली होती की, ‘लोक कार्बन फुटप्रिंट च्या विषयी विचार करून चिंता करतात. परंतु जर हे फुटप्रिंट जर कमी झाले तर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग च्या बद्दल चिंता करण्याची काहीही गरज नाही’. १७ वे एटीए संमेलनामध्ये सद्गुरू च्या समोर हे सांगताना उपासना ने त्यांना विनंती केली होती की त्यांनी तिच्या सासू ला या निर्णयाबद्दल समजवावे.
राम चरण त्याच्या दिलेल्या मुलाखतीत हे सांगताना दिसत आहे की अजून त्याचा कुटुंब वाढवण्याचा कोणताही निर्णय नाही. त्याचे म्हणणे होते की सिनेमा हे त्याचे पहिले प्रेम आहे आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर चाहत्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी आहे. राम चरण असे देखील म्हणाला होता की त्याने कुटुंबाची सुरुवात केल्यामुळे तो त्याच्या जबाबदारीपासून विचलित होईल.उपसानाचे देखील तिच्या जीवनातील काही गोल्स आहेत, ज्यांना तिला पूर्ण करायचे आहे. अशातच दोघेही अजून काही वर्ष बाळा बद्दल नियाजन करण्याचा विचार करत आहेत.
आजची बातमी हेच सांगते की जोडीने आता त्यांचे कुटुंब पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगु आणि साउथ सिनेमा मधील सर्वात मोठे चित्रपट कुटुंबामधील एक, कोनिडेला कुटुंब आता त्यांच्या पुढील पिढी मधील एका नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. चिरंजीवी आणि राम चरण दोघांचे चाहते सोशल मिडीयावर या बातमीला घेऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram