साऊथमधील सर्वात मोठा चित्रपट म्हणून समोर आलेला RRR कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. एस एस राजामौली, जूनियर एनटीआर आणि राम चरण च्या या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आता या चित्रपताला ऑस्कर मिळण्याची वेळ आली आहे. यादरम्यान राम चरणने काही असे केले आहे ज्यामुळे तो खूपच चर्चेमध्ये आला आहे. राम चरणने RRR साठी एक नवस मागितला होता ज्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
After the immense love for the #GoldenGlobes from the USA, ‘Mega Powerstar’ @AlwaysRamCharan sets off to the next stop on the #RRR course – The #Oscars2023 ✨️#NaatuNaatuForOscars pic.twitter.com/gLz2v1jdwA
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) February 21, 2023
वास्तविक राम चरणचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या आलिशान गाडीमधून विमानतळावर पोहोचताना दिसत आहे. तो जेव्हा गाडीतून खाली उतरला तेव्हा लोक त्याला पाहून हैराण झाले. राम चरणने यादरम्यान आपल्या पायांमध्ये काहीच घातलेले नव्हते.
जवळ जवळ १३०० नेटवर्थ असणारा राम चरण विमानतळावर अनवाणी पायाने चालताना दिसला. त्याने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता, हातामध्ये एक काळ्या रंगाचा रुमाल आहे आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. सध्या हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये राम चरणच्या साधेपणाने लोकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ तेव्हा घेतला आहे जेव्हा तो आपल्या ऑस्कर अवॉर्ड ईवेंटमध्ये आपल्या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या आशेमध्ये जात आहे. राम चरणने RRR ला अवॉर्ड मिळण्यासाठी नवस मागितला आहे आणि बिना चप्पल अनवाणी प्रवास करणे त्याच्या नवसाचा एक भाग आहे. ऑस्कर अवॉर्ड्स १२ मार्चला होणार आहे.
तथापि राम चरण याआधी देखील अशा अवतारामध्ये पाहायला मिळाला आहे. राम चरण खूपच धार्मिक व्यक्ती आहे आणि त्याने अय्यप्पा दीक्षा घेतली आहे. अय्यप्पा दीक्षा घेतल्यानंतर ४८ दिवसांपर्यंत त्याला काळे कपडे घालून अनवाणी पायाने राहावे लागणार होते. राम चरण या नियामचे काटेकोरपणे पालन करतो.