HomeBollywoodसुष्मिता-ललित यांच्या अफेअरची ‘या’ अभिनेत्रीने उडवली खिल्ली, म्हणाली; बाप आणि लेकीच्या वयाचे...

सुष्मिता-ललित यांच्या अफेअरची ‘या’ अभिनेत्रीने उडवली खिल्ली, म्हणाली; बाप आणि लेकीच्या वयाचे…

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे फाऊंडर ललित मोदी यांच्या अफेयरच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. अशामध्ये आता ललित मोदी यांच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

राखी सावंतने देखील यामध्ये आपले हात धुवून घेतले आहेत. राखीने सुश्मिता आणि ललित यांच्या अफेयरची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ललित मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी फोटो शेयर करून सुश्मिता सेनला डेट करत असल्याचे म्हंटले आहे. फोटोमध्ये दोघांची चांगलीच जवळीक दिसून येत होती.

यादरम्यान त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगल्या पण नंतर त्यांनी पुन्हा ट्वीट करत अजून लग्न झाले नसल्याचे सांगितले. यावर राखीने त्यांची खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली आहे कि सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे फोटोमध्ये बाप-लेक असल्यासारखेच वाटत आहेत.

ललित मोदी यांच्या पोस्टवर सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ललित मोदी आणि सुश्मिता सेनच्या नात्याबद्दल बोलताना राखी म्हणाली कि, व्वा खूपच भारी काम, थेट सुश्मिता सेनलाच मिळवले. मी सुरुवातीला जेव्हा दोघांचे फोटो पाहिले तेव्हा मला वाटले दोघे बाप-लेकच आहेत.

दरम्यान व्हिडीओ काढणाऱ्यांनी राखीला आठवण करून दिली कि ललित मोदी तो व्यक्ती आहे जो पैसे घेऊन परदेशामध्ये पळून गेला आहे. यावर राखी म्हणते इतका पैसा असेल तर अशा अभिनेत्री तर पटणारच ना. आजकाळ कोण बुद्धी आणि चेहरा बघून प्रेम करत नाही तर सगळं पैशांचा खेळ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts