HomeBollywoodराखी सावंतवर कोसळला दुःखाचा डोंगर, राखी सावंतच्या आईचे निधन, पती आदिलने दिली...

राखी सावंतवर कोसळला दुःखाचा डोंगर, राखी सावंतच्या आईचे निधन, पती आदिलने दिली माहिती…

दीर्घकाळापासून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या राखी सावंतची आई जया सावंतचे निधन झाले आहे. राखी सावंतचा पती आदिल दुर्रानीने याची माहिती दिली. राखीची आई गेल्या काही दिवसांपसून कर्करोगासारख्या आजाराने ग्रस्त होती. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर राखीला माहिती मिळाली होती कि तिच्या आईची प्रकृती खूपच बिघडली आहे. यानंतर राखी सरळ बिग बॉस मधून हॉस्पिटलमध्ये पोहोचली. शनिवारी राखी सावंतच्या आईचे निधन झाले.

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आईच्या प्रकृतीमुळे चिंताग्रस्त होती. राखी सतत तिच्या आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत होती. राखी सावंतची आई जया सावंत कर्करोगामुळे हॉस्पीटलमध्ये भरती झाली होती. राखीने आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करतानाचे व्हिडीओ देखील शेयर केले. राखीच्या आईच्या निधनानंतर तिचे चाहते खूप दुखी झाले आहेत. राखीने नुकतेच तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते.

राखी सावंतने नुकतेच तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल चर्चा केली होती. राखी सावंतने मदत करणाऱ्यांचे आभार मानले होते. त्याच्बारोब्त चाहत्यांना आई ठीक होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर उपचारासाठी मदत करणाऱ्यांचे राखीने आभार मानले होते. नुकतेच राखी सावंतच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे. आता आईच्या निधनानंतर राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राखी सावंतने नुकतेच तिच्या आईच्या ट्यूमरबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी राखीने सांगितले होते कि तिची आई कर्करोग ग्रस्त झाली आहे. र्काहीने सांगितले होते कि तिच्या आईची प्रकृती खूपच नाजूक आहे. ट्यूमर आईच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला आहे. यानंतर राखीच्या आईवर उपचार सुरु होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts