बिग बॉस फेम राखी सावंतने आपल्या लग्नाचा खुलासा करून पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. नुकतेच तिने तिच्या लग्नाचे काही फोटो शेयर केले आहेत. तिने ७ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केले आहे. तिने आदिलसाठी नाव बदलून फातिमा ठेवले आहे. हे लग्न जुलै २०२२ मध्ये झाले होते. पण हैराण करणार गोष्ट हि आहे कि अजूनपर्यंत आदिल गप्प आहे.
यादरम्यान राखीने आदिलच्या मौनाबद्दल आणि फॅमिली प्लानिंगबद्दल मुलाखतीदरम्यान बातचीत केली आहे. तिने इशाऱ्या इशाऱ्यामध्ये असे काही सांगितले आहे कि ज्यामुळे आता हा अंदाज लावला जात आहे कि राखी सावंत प्रेग्नंट आहे. राखीने सिंगल मदरवर देखील आपले मत व्यक्त केले.
राखी सावंत म्हणाली कि मी खूप खुश आहे कि आदिलसोबत मी लग्न केले. मला माहिती नाही कि त्याचे नकार देण्याचे काय कारण आहे. मी धक्क्यामध्ये आहे कि आदिल शेवटी लग्नाला का नकार देत आहे. मी गेल्या सात महिन्यांपासून सांगत आहे कि आपल्याला लग्नाबद्दल सर्वांना सांगायला हवे. कारण मी एक सेलिब्रिटी आहे माझे लाईफ कोणापासून लपून राहिलेले नाही. दरम्यान प्रेग्नंसी होण्याची देखील शक्यता आहे किंवा आणखी काही होऊ शकते.
जेव्हा राखी सावंतला प्रेग्नंसी बद्दल प्रश्न पुन्हा विचारला गेला तेव्हा ती म्हणाली कि सध्या मला याबद्दल काही सांगायचे नाही. सध्या जो मी लग्नाबद्दल खुलासा केला आहे तो खूप जरुरीचा होता. जर हि गोष्ट समोर आली नसती तर खूपच अडचण झाली असती. मी खूप घाबरले आहे. माझ्या आरोग्यावर देखील याचा वाईट परिणाम होत आहे. फॅमिली प्लॅनिंगवर राखी सावंत म्हणाली की, मी सिंगल मदर झाले तरी मरेपर्यंत आदिलवर प्रेम करेन.
View this post on Instagram