HomeBollywoodआई आजारी असताना राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत उरकलं लग्न, फोटो सोशल...

आई आजारी असताना राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत उरकलं लग्न, फोटो सोशल मिडियावर व्हायरल…

राखी सावंतचे नाव समोर येताच प्रत्येकजण विचार करतो कि आता राखी सावंत कोणता नवीन ड्रामा करणार आहे. यावेळी राखी सावंतचा नवीन ड्रामा समोर आला आहे. तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ती लग्न करत असलेली पाहायला मिळत आहे. असा दावा केला जात आहे कि राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत गुपचूप लग्न केले आहे.

एका फोटोमध्ये पाहायला मिळत आहे कि राखी सावंत लाल रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे आणि सर्टिफिकेटवर सही करत आहे. ब्लॅक शर्ट आणि ब्लू जींसमध्ये आदिल तिच्यासोबत बसला आहे. तर दुसर्या फोटोमध्ये दोघांनी गळ्यामध्ये हार घातले आहेत आणि मॅरेज सर्टिफिकेट घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल दुर्रानी रिलेशनशिपमध्ये दोघांनी आपले नाते कधीच लपवले नाही. आदिलने मुलाखतीमध्ये सांगितले आहे कि तो हळू हळू आपल्या आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. रितेशपासून वेगळे झाल्यानंतर राखी सावंत आदिलसोबत रिलेशनमध्ये आली होती. यानंतर दोघांनी हि गोष्ट देखील स्वीकार केली कि ते कपल आहेत. आदिलने सांगितले आहे कि तो लवकरच राखीसोबत लग्न करणार आहे आणि यासाठी तो तिच्या कुटुंबियांना कन्विंस करत आहे. आता माहितीनुसार आदिल आणि राखीने गुपचूप लग्न केले आहे. त्यांचे हे फोटो कोर्टमधून लिक झाले आहेत.

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यातील नात्याची सर्वांनाच कल्पना आहे. सोशल मिडियावर काही असे फोटो लीक झाले आहेत ज्यामध्ये राखी आणि आदिल कोर्टमध्ये लग्न करताना दिसत आहेत. याआधी राखी सावंत रितेश सिंहसोबत विवाह बंधनात अडकली होती. पंत त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही.

राखीने रितेशचा कोणताच फोटो शेयर केला नव्हता. त्याचे इंट्रोडक्शन तिने बिग बॉसमध्ये केले होते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत आणि रितेश वेगळे झाले होते. रितेश आधीपासूनच विवाहित होता आणि एका मुलाचा पिता आहे. राखीचे म्हणणे होते कि कोर्टशिप दरम्यान रितेशने हि गोष्ट तिच्यापासून लपवली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by FILMYWAVE (@filmywave)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts