अभिनेत्री राखी सावंत जिला सामन्यात: कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून ओळखले जाते, सध्या खूपच कठीण काळामधून जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आपल्या लग्नाच्या फोटोंमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. कारण तिचा पती आदिल दुर्रानीच्या रिपोर्ट्सनुसार लग्नाला नकार दिला आहे.
इतकेच नाही तर राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर आहे ज्यामुळे तिची प्रकृती खूपच नाजूक आहे. यादरम्यान अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीचा चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागलेल्या होत्या ज्यावर अभिनेत्रीने कमेंट करण्यास नकार दिला. आता अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे कि ती प्रेग्नंट होती.
राखीचा पती आदिल दुर्रानीने काही वेळापूर्वी राखी आणि आपल्या लग्नाला कबूल केले आहे आणि त्याने हि घोषणा केली आहे कि राखी आणि मी आता पती पत्नी आहोत. या चर्चांदरम्यान आता हि बातमी समोर आली आहे कि राखी सावंत आपले पहिले मुल एक्सपेक्ट करत आहे ज्यावर राखीने फक्त इतकेच म्हणते कि, नो कमेंट्स!
आता यादरम्यान व्हायरल भैयानीची एक पोस्ट समोर आली आहे ज्यानुसार अभिनेत्री कबूल केले आहे कि जेव्हा ती बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होती तेव्हा ती प्रेग्नंट होती. हि गोष्ट खरी आहे. व्हायरल भैयानीच्या पोस्ट नुसार त्यांनी राखीसोबत बातचीत केली ज्यामध्ये राखीने हे सांगितले.
राखी म्हणाली कि एक खूपच कठीण काळामधून ती जात आहे. अभिनेत्री म्हणाली कि मी खरंच प्रेग्नंट होते पण आता तिचे मिसकॅरेज झाले आहे. हि गोष्ट स्वत: राखी सावंतने कन्फर्म केली आहे.
View this post on Instagram