तारक मेहता का उल्टा चश्मा शो अनेक वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान अनेक कलाकरांनी या शोमधून काढता पाय घेतला. आता या लिस्टमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मधील टप्पू म्हणजेच राज अनादकटचे देखील नाव सामील झाले आहे. राज अनादकटबद्दल एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होत होती कि राज अनादकट तारक मेहता का उल्टा चश्मा शो सोडणार आहे. पण प्रत्येकवेळी तो हि फक्त एक अफवा असल्याचे सांगत होता. तथ्पाई यावेळी टप्पूने स्वतः सोशल मिडियावर शो सोडण्याची घोषणा केली आहे. पोस्ट शेयर करत अभिनेत्याने लिहिले आहे कि, आता ती वेळ आली आहे जेव्हा सर्व चर्चांवर पूर्णविराम द्यावा लागेल. नीला फिल्म्स आणि तारक मेहता का उल्टा चश्मा सोबत माझा अधिकृत करार संपला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा बद्दल पुढे सांगताना त्याने लहिले आहे कि, मी खूप काही शिकलो आहे. मित्र बनवले, हे वर्ष माझ्या करियरमधील सर्वात बेस्ट होते. मी त्या सर्व लोकांचा आभारी आहे ज्यांनी मला या जर्नीमध्ये साथ दिली. तारक मेहताची संपूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंब आणि तुम्हा सर्व लोकांचा मी आभारी आहे. तुम्ही मला टप्पच्या भूमिकेमध्ये स्वीकार केले, प्रेम दिले. तुमच्या या सपोर्टमुळे मला काहीतरी चांगले करण्याची हिम्मत मिळत राहिली. तारक मेहताच्या संपूर्ण टीम आणि शोच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट.
काही महिन्यांपूर्वी राज अनादकटने रणवीर सिंहसोबत एक फोटो शेयर केला होता. या फोटोद्वारे त्याने सांगितले होते कि त्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तथ्पाई ते स्वप्न काय होते, याबद्दल त्याने काहीच माहिती दिली नव्हती. आता राजने आश्वासन दिले आहे की, तो लवकरच एका नव्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
राज अनादकटच्या अगोदर तारक मेहताम्ह्ये टप्पूची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. भव्यने शो सोडल्यानंतर २०१७ मध्ये राज अनादकट शोसोबत जोडला गेला होता. टप्पूच्या भुमिकेमध्ये राजला खूप प्रेम मिळाले आणि तो प्रत्येकाचा फेवरेट बनला. अशामध्ये तारक मेहतामध्ये त्याची अनुपस्थिती जाणवणे साहजिकच आहे.
View this post on Instagram