HomeBollywoodआलिया-रणबीर ‘या’ दिवशी शेयर करणार मुलगी ‘राहा’चा पहिला फोटो, चेहरा दाखवण्यापूर्वी करणार...

आलिया-रणबीर ‘या’ दिवशी शेयर करणार मुलगी ‘राहा’चा पहिला फोटो, चेहरा दाखवण्यापूर्वी करणार ‘हे’ काम…

Raha Kapoor First Photo Ranbir Alia Daughter: रणबीर कपूर आणि आलिया भट्टसाठी हे वर्ष खूपच खास आहे. कारण कपलने एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते नंतर जूनमध्ये आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा (Alia Bhatt Pregnancy Announcement) केली होती. सप्टेंबरमध्ये दोघांचा ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज झाला होता जो ब्लॉकबस्टर हिट झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये आलिया-रणबीरने आपल्या कुटुंबामध्ये मुलगी राहाचे (Alia Ranbir Daughter Name Raha Kapoor) स्वागत केले होते.

माहितीनुसार आलिया-रणबीर अनुष्का-विराटसारखे नो फोटो पॉलिसी ठेऊ शकतात. तर आता एका रिपोर्टनुसार अशी माहिती समोर आली आहे कि आलिया-रणबीर कोणत्या दिवशी आपल्या मुलीचा चेहरा दाखवणार आहेत आणि त्या दिवशी दोघे मुलीसोबत काय करणार आहेत.

एका रिपोर्टनुसार आलिया-रणबीर आपल्या मुलीसाठी नो फोटो पॉलिसी ठेवणार नाहीत जसे अनुष्का-विराटने ठेवली आहे. आलियाला माहिती आहे कि पुढे जाऊन तिच्या मुलीचा मिडियाशी सामना होणार आहे, तेव्हा ती करीना सारखी रिलॅक्स राहणार आहे.

आता तुम्ही विचार करत असाल कि राहाचा पहिला फोटो कधी पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार आलिया-रणबीर सध्या आपल्या मुलीचा चेहरा दाखवू इच्छित नाहीत. ते आपल्या मुलीचा चेहरा तेव्हा दाखवणार आहेत जेव्हा ती सहा महिन्याची होणार आहे. त्यानंतर ते आपल्या मुलीच्या चेहऱ्याबद्दल इतके प्रोटेक्टिव राहणार नाहीत.

आणखी एक खास गोष्ट म्हणजे आलिया-रणबीर आपल्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर शेयर करण्यापूर्वी काही वेगळे करणार आहेत. असे म्हंटले जात आहे कि दोघे आपल्या मुलीसोबत व्हेकेशनवर जाणार आहेत आणि परत आल्यानंतरच ते राहाचे चेहरा दाखवणार आहेत. आलियाने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर रीवील केले होते कि तिच्या मुलीचे नाव राहा असणार आहे. हे नाव राहाची आजी नीतू कपूरने ठेवले आहे. ज्याचा अर्थ दिव्य पथ (Divine Path), आनंद (Happiness), स्वतंत्र्य (Freedom) असा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts