HomeBollywoodजेव्हा राधिकाला ‘ब्रे स्ट’ छोटे असल्यामुळे दिला जात होता सर्जरीचा सल्ला, अभिनेत्रीने...

जेव्हा राधिकाला ‘ब्रे स्ट’ छोटे असल्यामुळे दिला जात होता सर्जरीचा सल्ला, अभिनेत्रीने उघड केली अशी गुपिते, जाणून व्हाल थक्क…

राधिका आपटे चित्रपट इंडस्ट्री मध्ये तिच्या कामासोबतच स्पष्टवक्तेपणा साठी ओळखली जाते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिने अनेकवेळा अनेक भूमिका गमावल्या आहेत. नंतर तिच्या या भूमिका काही तरुण अभिनेत्यांना देण्यात आल्या. राधिका चे म्हणणे आहे की इंडस्ट्री मध्ये वय हा मोठा घटक आहे आणि इथे मोठ्या व्यावसायिक चित्रपटांसाठी फक्त तरुण अभिनेत्रींना प्रोत्साहन दिले जाते.

राधिका चे म्हणणे आहे की तिने अनेकवेळा अशा परिस्थितीचा सामना केला आहे. अनेक वेळा लोकांनी ही गोष्ट तिच्या समोर सांगितली की ही भूमिका तरुण अभिनेत्रींसाठी योग्य आहे. तथापि अभिनेत्रीने स्पष्ट पणे सांगितले की या गोष्टींचा तिच्यावर कोणताही परिणाम नाही झाला. तिने कधी काम मिळवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी किंवा ब्रे स्ट सर्जरी करण्याविषयी कधीही विचार केला नाही. राधीकाचे हे देखील म्हणणे आहे की आता गोष्टी आधीपेक्षा खूपच बदलल्या आहेत. आता वय आणि आकार वर कोणीही जास्त लक्ष देत नाही.

राधिकाचा चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ प्रदर्शित झाला आहे. अलीकडे राधिकाने सिद्धार्थ कनन सोबत बोलताना सांगितले की, ‘इथे वय एक घटक आहे त्याला खूपच महत्व दिले जाते. त्यांना तरुण चेहरा, प्रत्येक गोष्ट पाहिजे असते. लोक अश्या अनेक मागण्या करतात की या सगळ्यांचा अर्थ काय आहे. आजच्या या जगात अनेक लोक आहेत की जे काम मिळवण्यासाठी सर्जरी करून घेतात. सगळे त्यांच्या प्रतिमेच्या मागे धावत आहेत. फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात असे होत आहे. परंतु आज देखील काही स्त्रिया सर्जरी च्या विरुद्ध लढा देत आहेत’

आपले मत मांडताना राधिका सांगते की आधीपेक्षा आता खूपच बदल झाला आहे. ब्रान्ड आता पुरुष, स्त्रिया यांचे वय, साईज च्या लोकांना प्रोत्साहन देत आहेत. परंतु एक असा देखील काळ होता जेव्हा मी यासाठी संघर्ष केला. फक्त मीच नाही असे अनेक लोक आहेत ज्यांनी या परिस्थितीचा सामना केला आहे. परंतु मी एक गोष्ट जाणते की सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही लोकांसोबत कसे वागता, इथे स्वतः निर्णयावर ठाम राहतात.

राधिका आपटे चा चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये राधिका च्या सोबत राजकुमार राव, हुमा कुरेशी, सिकंदर खेर आणि आकांक्षा रंजन कपूर देखील दिसणार आहे. राधिका आपटे च्या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलाल तर त्यामध्ये एक एसीपी च्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts