कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार आज आपल्यामध्ये नाही. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या निधनाचा धक्का त्याच्या चाहत्यांना खूप मोठा बसला होता. पुनीत राजकुमारचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लाखो चाहते जमले होते.
दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार जर आपल्यामध्ये असतात तर त्याने तो त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत असता. अशामध्ये बर्थ एनिवर्सरीच्या निमित्ताने आपल्या त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत.
पुनीत राजकुमारचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी निर्माता पर्वतम्मा राजकुमारच्या घरी झाला होता आणि पाच भावांमध्ये पुनीत राजकुमार सर्वात लहान होता. त्याला लहानपणापासूनच अभिनयामध्ये रुची होती आणि यामुळे त्याने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
छोट्या वयामध्ये पुनीत राजकुमार चित्रपटाच्या सेटवर जाऊ लागला होता ज्यामुळे त्याचे अभ्यासामध्ये मन लागत नव्हते आणि त्याने कमी वयामध्येच शिक्षण सोडून दिले होते. तथापि त्याने होम ट्यूटर च्या मदतीने त्याने आपले पुढचे शिक्षण कंप्लीट केले. पुनीत राजकुमारने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला होता.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी पुनीत राजकुमारला बेट्टाडा हूवू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि इतकेच नाही तर पुनीत राजकुमारला कन्नड चित्रपटामधील राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि दोनवेळा कर्नाटक स्टेट फिल्म अवार्ड मिळाला आहे. हेच कारण आहे कि जेव्हा पुनीत राजकुमारने या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लाखो लोक जमले होते आणि अभिनेत्यांच्या चाहत्यांना त्याच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता.
पुनीत राजकुमार एक उत्कृष्ट अभिनेता तर होताच त्याचबरोबर तो एक चांगला व्यक्ती देखील होता. २०१९ मध्ये जेव्हा कर्नाटकमध्ये पूर आला होता तेव्हा पुनीत राजकुमार लोकांच्या मदतीसाठी पुढे आला होता त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाखाचे डोनेशन केले होते आणि इतकेच नाही तर कर्नाटक सरकारच्या रिलीफ फंड पुनीत राजकुमारने ५० लाख रुपयांचे डोनेशन केले होते.
पुनीत राजकुमार ४६ फ्री स्कूल, २६ अनाथाश्रम, १६ वृद्धाश्रम आणि १९ गोशाळा चालवत होता. इतकेच नाही तर तो कन्नड शाळांमध्ये दर महिन्याला लाखोंचे डोनेशन करत होता जेणेकरून मुलांना चांगले शिक्षण मिळावे. पुनीत राजकुमारला त्याच्या आईकडून चांगल्या कामांमध्ये नेहमीच मदती मिळाली होती. आईसोबत मिळून तो शक्ति धाम नावाचे आश्रम देखील चालवत होता जे म्हैसूरमध्ये आहे.
पुनीत राजकुमार लाखो गरीब लोकांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलत होता आणि अनाथ आश्रममध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तो दर महियाला लाखो रुपये डोनेशन करत होता. जेव्हा अभिनेत्याचे निधन झाले होते तेव्हा बेंगळूरुच्या एका सरकारी शाळेमधील मुलांनी त्याला स्पेशल अंदाजामध्ये श्रद्धांजलि अर्पित केले होती.
२९ ऑक्टोबर २०२१ रोजी पुनीत राजकुमारने या जगाचा निरोप घेतला. पुनीत राजकुमारचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ३० लाखापेक्षा जास्त लोक पोहोचले होते. पुनीत राजकुमारने डोळे दान करण्याचा देखील निर्णय घेतला होता. अंतिम श्वास घेण्यापूर्वी त्याने डोळे दान केले होते.
२६ अनाथाश्रम, ४६ मोफत शाळा, १६ वृद्धाश्रम चालवत होता पुनीत राजकुमार, दिवंत अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जमले होते लाखो चाहते…
RELATED ARTICLES